मोहित आणि स्वीटूच्या साखरपुड्याच्या दिवशी ओम देणार प्रेमाची कबुली!

‘येऊ कशी तशी नांदायला’मध्ये रंजक वळण

yeu kashi tashi nandayla,

एका गोड नात्याची कथा सांगणारी ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका झी मराठीवर आली आणि अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. रसिक प्रेक्षकांनी मालिकेला आणि त्यातील नलू मावशी, दादा, चिन्या, शकू मावशी, मालविका, रॉकी या पात्रांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. अन्विता फलटणकर आणि शाल्व किंजवडेकर या फ्रेश जोडीने तरुणाईवर छाप सोडली आहे.

मोहित आणि आईकडून पदोपदी अपमान होऊन सुद्धा मोहित आणि स्वीटूचा साखरपुडा होतोय, किंबहुना नलू मावशीचा हा हट्टच आहे. चिन्या आणि रॉकी हा साखरपुडा होऊ नये म्हणून प्रयत्न करत आहेत.

आणखी वाचा : जवळच्या व्यक्तीला गमावूनही श्रेया बुगडे करतीये प्रेक्षकांचं मनोरंजन

अखेर तो दिवस येतो आणि साखरपुड्याच्या दिवशी मोहीतला आणि त्याच्या आईला जाणवत की स्वीटूचे लक्ष या सोहोळ्यात नसून ती वेगळ्याच विचारात आहे. ओम आणि स्वीटूमध्ये काहीतरी सुरु आहे. हे कुठेतरी मोहित आणि त्याच्या आईला पचनी पडत नाहीये. म्हणून त्या स्वीटूवर नको नको ते आरोप करतात. या सगळ्यात ओम मध्ये पडून स्वीटू कशी निर्दोष आहे हे पटवून देतो आणि पुन्हा एकदा आपलं स्वीटूवर प्रेम असल्याची कबुली देतो. या प्रेमाच्या कबुलीनंतर मालविकाचा प्रचंड संताप होतो.

या सर्व घडामोडीनंतर आता काय असेल मालविकाची पुढची खेळी? स्वीटूचा सगळ्यांसमोर झालेल्या अपमानानंतर साळवी कुटुंब विशेषतः नलू मावशी या प्रेमाला होकार देतील? या सगळ्या प्रश्नांची उत्तर येत्या आठवड्यात पाहायला मिळणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Yeu kashi tashi nandayla serial update avb

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या