पत्नीच्या गंभीर आरोपांनंतर अखेर यो यो हनी सिंगनं सोडलं मौन, म्हणाला…

हनी सिंगने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यावर प्रतिक्रिया दिली आहे.

yo yo honey singh, honey singh wife shalini talwar,
हनी सिंगने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यावर प्रतिक्रिया दिली आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध रॅपर हनी सिंग एका वेगळ्याच प्रकरणामुळे सध्या चर्चेत आला आहे. हनी सिंगच्या विरोधात पत्नी शालिनी तलवारने छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण कायद्यांतर्गत शालिनीने हनी सिंगविरोधात तक्रार नोंदवली आहे. पती हनी सिंग तसेच सासरच्या मंडळीकडून शारीरिक, शाब्दिक, मानसिक छळासोबतच अत्याचाराला अनेकदा सामोरे जावे लागल्याचे शालिनीने म्हटले आहे. त्यानंतर आता हनी सिंगने पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे.

हनी सिंगने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये हे सगळे आरोप खोटे असल्याचे हनी सिंगने म्हटले आहे. “२० वर्षापासून शालिनी तलवार माझी पत्नी आहे. त्याच शालिनीने माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर लावलेले सगळे आरोप हे खोटे आहेत. हे सगळे आरोप ऐकून मला दु:ख झालं आहे. भूतकाळात माझ्या गाण्यांवर आणि माझ्या आरोग्याविषयी अनेक नकारात्मक गोष्टींवरून माझ्यावर टीका करण्यात आल्या, तरी मी कधीही प्रेस नोट किंवा कोणतीही पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, यावेळी शांत राहून काही होणार नाही असं मला वाटलं, कारण यावेळी माझ्या वृद्ध पालकांवर आणि धाकट्या बहिणीवर…जे माझ्या वाईट परिस्थितीत माझ्यासोबत होते त्यांच्यावर आरोप केले आहेत. हे सगळे आरोप बदनाम करणारे आहेत,” असे हनी सिंग म्हणाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yo Yo Honey Singh (@yoyohoneysingh)

आणखी वाचा : सुरेश वाडकर यांनी माधुरीला दिला होता लग्नाला नकार, कारण…

पुढे हनी सिंग म्हणाला, “मी गेल्या १५ वर्षांपासून या इंडस्ट्रीत आहे आणि देशभरातील कलाकार आणि संगीतकारांसोबत काम केले आहे. माझ्या टीममध्ये गेल्या १० वर्षांपासून जे लोक आहेत, त्यांना माझ्या आणि माझ्या पत्नीचे संबंध कसे आहेत याबद्दल माहित आहे. ती प्रत्येक चित्रीकरणाला, कार्यक्रमाला आणि मीटिंगमध्ये सोबत असते. या सगळ्या आरोपांचे मी खंडन करतो पण मी यावर काही बोलणार नाही कारण हे प्रकरण न्यायालयात आहे. या देशाच्या न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि मला विश्वास आहे की सत्य लवकरच समोर येईल.”

आणखी वाचा : पॉर्न चित्रपटाच्या ६ तासांच्या चित्रीकरणासाठी ‘नॅंसी भाभी’ घ्यायची इतके रुपये; कमाईचा आकडा ऐकून व्हाल थक्क

पुढे हनी सिंग म्हणाला, “या आरोपांवर उत्तर देण्यासाठी मला न्यायालयाने संधी दिली आहे. दरम्यान, मी माझ्या चाहत्यांना आणि इतर लोकांना विनंती करतो की जोपर्यंत न्यायालय दोन्ही बाजू ऐकून निर्णय घेत नाही तोपर्यंत माझ्या आणि माझ्या कुटुंबाविषयी कोणतेही निष्कर्ष काढू नका. मला विश्वास आहे की न्याय नक्कीच मिळेल आणि सत्य कधी ही लपत नाही. जो खरं बोलत असेल तो जिंकेल. नेहमीप्रमाणे, मी माझ्या चाहत्यांचे आणि हितचिंतकांच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल कृतज्ञ आहे, ज्यांनी मला परिश्रम आणि चांगली गाणी बनवण्याची प्रेरणा दिली.”

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Yo yo honey singh reacts on wife shalini talwar s domestic violence allegations breaks silence over her accusations dcp

ताज्या बातम्या