अरमान मलिक हा प्रसिद्ध युट्यूबर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही महिन्यांपूर्वी अरमानच्या दोन्ही पत्नी एकाच वेळेस गरोदर असल्याचं वृत्त होतं. त्यामुळे त्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अरमानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून दोन बायका गरोदर असताना आता अरमान तिसरं लग्न केलं का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
अरमान मलिकला कृतिका मलिक आणि पायल मलिक या दोन बायका आहेत. दोन्ही बायका गरोदर असताना अरमान तिसऱ्या बायकोला घरी घेऊन आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अरमानच्या तिसऱ्या पत्नीला पाहून त्याच्या दोन्ही बायका चिडल्याचं दिसत आहे. त्यानंतर अरमान व त्याच्या तिसऱ्या पत्नीला पायल व कृतिका सुनावत असल्याचंही व्हिडीओत पाहायला मिळत आहे.
हेही वाचा>> आदिल खानचं दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर; राखी सावंतचे पतीवर गंभीर आरोप, म्हणाली “त्याने कुराणवर हात ठेवून…”
हेही वाचा>> Video: वनिता खरात-सुमित लोंढेचा हळदी कार्यक्रमात भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल
अरमान मलिकच्या या व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याने खरंच तिसरं लग्न केलं का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. परंतु, अरमानने तिसरं लग्न केलेलं नाही. त्याने त्याच्या दोन्ही बायकांबरोबर फक्त प्रॅंक केल्याचं व्हिडीओत पुढे पाहायला मिळत आहे.
दरम्यान अरमान मलिकने २०११ मध्ये पायल मलिकबरोबर लग्न केले. त्यांन चिरायू मलिक नावाचे एक मूलही आहे. सहा वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर अरमानने २०१८ मध्ये पुन्हा कृतिका मलिकशी लग्न केले, जी अरमानची पहिली पत्नी कृतिकाची सर्वात चांगली मैत्रीण आहे.