यूट्यूबर अरमान मलिक गेले काही दिवस त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या दोन्ही पत्नी एकाच वेळी गरोदर आहेत. यामुळे त्याच्यावर जोरदार टीकाही करण्यात आली होती. तर आता लवकरच त्याच्या घरी दोन नव्हे तर तीन चिमुकल्यांचं आगमन होणार आहे. आता अरमान आणि त्याच्या दोन्ही पत्नींनी मिळून जोरदार तयारी सुरु केली आहे.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
अरमानच्या पहिल्या पत्नी पायल जुळ्या मुलांना जन्म देणार आहे, तर त्याची दुसरी पत्नी कृतिका एकाच बाळाला जन्म देईल असं बोललं जात आहे. अरमान मलिक सोशल मीडियावर सक्रिय राहून त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांचे शेअर करत असतो. काही दिवसांपूर्वी त्याने त्याच्या दोन्ही पत्नींचं डोहाळेजेवण साजरं केलं होतं. तर आता लवकरच तो बाबा होणार आहे.
अलीकडेच अरमान मलिकने त्याच्या YouTube चॅनेलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्याने चाहत्यांना त्याच्या होणाऱ्या मुलांसाठी खरेदी केलेल्या नवीन गोष्टींची झलक दाखवली आहे. त्याने त्याच्या बाळांना झोपण्यासाठी पाळणा खरेदी केला आहे. हा पाळणा अत्यंत आरामदायी आहे. आता त्याच्या या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अरमानने २०११ मध्ये पायलशी लग्न केलं. त्या दोघांना चिरायू मलिक हा मुलगा आहे. लग्नाच्या सहा वर्षानंतर अरमानने पायलला घटस्फोट न देता 2018 मध्ये पायलची खास मैत्रीण कृतिकाशी लग्न केलं. तेव्हापासून हे चौघेही एकत्र राहतात.