मी रिलेशनशिपमध्ये होतो पण…; अभिनेत्याने सोनाक्षीसोबतच्या अफेअरवर दिले स्पष्टीकरण

खरंच सोनाक्षी ‘या’ अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती का?

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या अभिनेता जहीर इकबालसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. हे दोघे कलाकार कधीकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते अशा बातम्या सोशल मीडियावर पसरवल्या जात आहे. मात्र या चर्चांवर आता स्वत: जहीरने स्पष्टीकरण दिले आहे.

नेमकं काय म्हणाला जहीर?

इ टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत जहीर म्हणाला, “कधीकाळी मी एका अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये होतो. मात्र ती अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नाही. मी कुणा दुसऱ्याच तरुणीच्या प्रेमात पडलो होतो. त्यामुळे सोनाक्षीसोबतच्या रिलेशनशिपच्या बातम्या म्हणजे केवळ अफवा आहेत. अशा अफवा कोण पसरवतं माहित नाही. सोनाक्षी माझी चांगली मैत्रीण आहे. आम्हा दोघांना एकत्र कुणीतरी पाहिलं असेल त्यावरुन आमच्या रिलेशनशिपचा निष्कर्ष काढला गेला असावा.” असं जहीर या मुलाखतीत म्हणाला.

 

View this post on Instagram

 

Last night for Lions Gold Awards Styled by : @sanamratansi Suit : @nerobyshaifaliandsatya

A post shared by Zaheer Iqbal (@iamzahero) on

कोण आहे जहीर इकबाल?

जहीर एक चित्रपट अभिनेता आहे. त्याने ‘द नोटबूक’ या चित्रपटातून आपल्या सिनेकारकिर्दीची सुरुवात केली होती. या चित्रपटाची निर्मिती सलमान खानने केली होती. याशिवाय सलमानच्या ‘जय हो’ या चित्रपटात देखील तो झळकला होता. जहीर ‘कुछ कुछ होता है’ फेम अभिनेत्री सना सईदसोबत रिलेशनशिपमध्ये होता असे म्हटले जाते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Zaheer iqbal on dating rumours with sonakshi sinha mppg

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या