scorecardresearch

सोनाक्षी सिन्हासोबत अफेअरच्या चर्चांवर जहीर इक्बालनं दिली प्रतिक्रिया, म्हणाला…

अभिनेता जहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या डेटिंगच्या चर्चा मागच्या बऱ्याच काळापासून सुरू आहेत.

zaheer iqbal, sonakshi sinha, zaheer sonakshi dating, sonakshi sinha boyfriend, zaheer iqbal girlfriend, सोनाक्षी सिन्हा, जहीर इक्बाल, सोनाक्षी सिन्हा बॉयफ्रेंड, सोनाक्षी- जहीर अफेअर, जहीर इक्बाल गर्लफ्रेंड
जहीर इक्बालचं नाव मागच्या बऱ्याच काळापासून सोनाक्षी सिन्हासोबत जोडलं जातंय.

मागच्या बऱ्याच काळापासून बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा अभिनेता जहीर इक्बालसोबतच्या तिच्या नात्यामुळे चर्चेत आहे. नोटबुक चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करणाऱ्या जहीर इक्बालचं नाव मागच्या बऱ्याच काळापासून सोनाक्षी सिन्हासोबत जोडलं जातंय. अशात आता या सर्व चर्चांवर जहीर प्रतिक्रिया दिली आहे. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत जहीरनं त्याचं पर्सनल लाइफ आणि डेटिंगच्या चर्चांवर भाष्य केलं.

जहीर इक्बाल नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रिलेशनशिप आणि डेटिंगच्या चर्चांवर बोलाताना म्हणाला, “या सर्व अफवा आहेत आणि आता या गोष्टींना एवढे दिवस होऊन गेलेत की मला याचा काहीच फरक पडत नाही. मी ठीक आहे, जर तुम्हाला असाच विचार करायचा असेल तर तुम्ही हेच विचार करत राहणार आणि करत राहा. हे तुमच्यासाठी चांगलं आहे. मी आणि सोनाक्षी रिलेशनशिपमध्ये आहोत असं विचार करून जर तुम्हाला आनंद मिळत असेल तर चांगलंच आहे. पण जर तुम्हाला त्रास होत असेल तर मला यासाठी वाईट वाटतंय, तुम्ही याबद्दल विचार करणं सोडून द्यायला हवं.”

जहीर पुढे म्हणाला, “अशा प्रकारच्या अफवा हा या इंडस्ट्रीचा एक भाग आहे. मी बॉलिवूडमध्ये येण्याआधीपासूनच मला ही गोष्ट माहीत होती. यातून सर्वच कलाकारांना जावं लागतं हे मी माझ्या मित्रांसोबत राहून पाहिलं होतं. एवढंच नाही तर सलमानने देखील मला हे सांगितलं होतं की, तुझ्याबद्दल अशा प्रकारच्या गोष्टी बोलल्या जातील पण त्यावर जास्त लक्ष द्यायचं नाही. त्यामुळे मी अशा गोष्टींचा फारसा विचार करत नाही.”

करिअरबद्दल बोलायचं तर जहीरनं ‘नोटबुक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तर सोनाक्षीनं २०१० साली सलमान खानच्या ‘दबंग’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. जहीरच्या कामाबद्दल बोलायचं तर, आगामी काळात त्याचा दुसरा चित्रपट ‘डबल एक्सएल’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरैशी यांच्यासोबत दिसणार आहे. याशिवाय त्याची सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ चित्रपटातही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-05-2022 at 10:17 IST

संबंधित बातम्या