Zanai Bhosle First post after Grandmother Asha Bhosle Death: गानसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनाने संपूर्ण देश दुखात बुडाला आहे. दादर येथील शिवाजी पार्कवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून, त्यांना अखेरचा निरोप देताना कुटुंबाला अश्रू अनावर झाले होते. विशेषतः त्यांची नात जनाई भोसले हिची अवस्था अतिशय हृदयद्रावक होती. दिग्गज गायिका आशा भोसले यांचं १२ एप्रिलला निधन झालं. १३ एप्रिलला, सोमवारी दादर येथील शिवाजी पार्कमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांची नात जनाई हिची तर रडून रडून वाईट अवस्था झाली आहे. लाडक्या आजीला अखेरचा निरोप दिल्यानंतर रात्री उशीरा जनाई भोसलेने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली.
जनाई भोसले आजीच्या खूप जवळ होती. आशा भोसले फिल्म इंडस्ट्रीतील कोणत्याही कार्यक्रमाला हजेरी लावायच्या, तेव्हा जनाई त्यांच्याबरोबर असायची. आजीच्या जाण्याने जनाईचा मोठा आधार हरपला आहे. जनाई आजीचे पार्थिव बघून धाय मोकलून रडतानाचे अनेक व्हिडीओ व फोटो समोर आले आहेत, ते पाहून चाहतेही भावुक झाले आहेत.
जनाई भोसलेची आजीसाठी पोस्ट
“मी सध्या खूप भावुक झाले आहे, जेव्हा मला शक्य होईल तेव्हा मी सविस्तर लिहेन. पण मला हे सांगायचंय की, आज अनेक लोकांनी तिचा आदर केला, तिला मान दिला आणि त्याही पलीकडे तिच्यावर अफाट प्रेम व्यक्त केलं.

मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानते. ती खरोखरच या प्रेमास पात्र होती. मला आता जाणवतंय की ती आपल्या सर्वांच्या हृदयात कायम जिवंत असेल आणि ती वरून हे सर्व पाहत आहे,” असं जनाईने आजी आशा भोसलेंच्या पार्थिवाचा फोटो पोस्ट करत लिहिलं.
जनाईने आजीबरोबरचे काही फोटो पोस्ट केले होते. ती पोस्ट तिने पुन्हा शेअर केली आणि ‘गूडबाय माय लव्ह, लव्ह ऑफ माय लाइफ’, असं त्यावर लिहिलं. आजीचं जाणं हा जनाईसाठी मोठा धक्का आहे. त्यामुळे ती भावुक झाली आहे.

आशा भोसले यांनी मराठी आणि हिंदीसह २० पेक्षा जास्त भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये गाणी गायली. त्यांनी मराठी आणि हिंदीसह २० पेक्षा जास्त भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये गाणी गायली. ८ दशकांहून अधिक काळ त्यांनी भारतीय संगीतसृष्टीवर अधिराज्य गाजवले. च्या जाण्याने भारतीय संगीतातील एका तेजस्वी पर्वाचा अंत झाला आहे. पण आपल्या गाण्यांच्या माध्यमातून त्या चाहत्यांच्या मनात कायम जिवंत राहतील.
