मालिकांमध्ये होणार गणेशोत्सवाचा जल्लोष

८ सप्टेंबर पासून हे विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

zee marathi, ganesh utsav, gapati bappa,
मालिकांचे विशेष भाग पाहायला मिळणार आहेत.

अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. सर्वत्र आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे. अशातच झी मराठी वाहिनीवरील मालिकांमध्येही श्रींच्या आगमनाची लगबग चालू आहे. प्रेक्षकांचा लाडक्या ‘वेध भविष्याचा’ या कार्यक्रमात गणेशोत्सवानिमित्त वेगवेगळे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. आदेश बांदेकर, स्वप्नील जोशी, भाऊ कदम, निलेश साबळे, श्रेया बुगडे, अनिता दाते, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, उमेश जगताप हे कलाकार या कार्यक्रमात उपस्थित राहून गुरुजींसोबत गप्पा मारणार आहेत. हे विशेष भाग १० सप्टेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीस येतील.

तसेच ‘होम मिनिस्टर सोबत लिटिल चॅम्प्स’ गणेशोत्सव साजरा करणार आहेत. आदेश भावोजी या विशेष भागात सारेगमप लिटिल चॅम्प्स मधील स्पर्धकांच्या कुटुंबाला भेट देणार आहेत. ८ सप्टेंबर पासून प्रेक्षक हे विशेष भाग पाहू शकतील. महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये नुकतीच झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीस आलेली ‘माझी तुझी रेशीमगाठ’ची टीम सज्ज होणार आहे. गणेशोत्सव विशेष भाग साजरा करण्यासाठी प्रार्थना बेहेरे, श्रेयस तळपदे आणि मायरा वैकुळ तसंच या मालिकेतील कलाकार या मंचावर हजर होणार आहेत.

‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत देखील गणरायाचा आगमन होणार आहे, आणि गणरायाच्या आगमनासोबतच दिपू आणि इंद्रा मध्ये मैत्रीच नातं खुलताना दिसेल. इकडे ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मध्ये देखील गणपती बाप्पाच्या आगमनाने ओम आणि स्वीटू मधील दुरावा दूर होणार का हे देखील पाहणं औसुक्याचा ठरणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Zee marathi ganpati special episode avb

ताज्या बातम्या