‘भल्या भल्या कलाकारांची शिट्टी वाजणार’, एक धमाकेदार कुकरी शो लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

संकर्षण कऱ्हाडे या कार्यक्रमात दिसणार एक वेगळ्या भूमिकेत

shankarshan karhade,

झी मराठीवरील प्रत्येक कार्यक्रम हा प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करतो आणि त्यातील कलाकार हे देखील प्रेक्षकांना आपलेसे वाटतात. असाच एक कलाकार म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. तो अभिनेता, कवी, लेखक अशा अनेक भूमिका निभावताना प्रेक्षकांना दिसतो, पण आता संकर्षण सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

झी मराठीवर ‘किचन कल्लाकार’ हा नवीन कुकरी शो प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून त्याचा टीझर नुकतंच वाहिनीवर सादर झाला. यामध्ये संकर्षण म्हणताना दिसतोय की, आता भल्या भल्या कलाकारांची शिट्टी वाजणार आणि मनोरंजनाची चव वाढणार. यावरून तर असंच दिसत की पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकारांचा या किचन मध्ये कस लागणार आहे. आता के कलाकार किचन मध्ये कसा कल्ला करणार हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे.
आणखी वाचा : “ब्लाऊज का उलटं घातलंस?”, वेडिंग लूकमुळे आलिया झाली ट्रोल

हा कुकींगशी संबंधीत शो पाहण्यासाठी सर्वंजण उत्सुक आहेत. या शोची रचना काय आहे संकर्षण सोबत अजून या शो मध्ये कोण असणार याबाबत काहीच माहिती समोर आलेली नाही. मात्र संकर्षणला या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Zee marathi new cooking show sankarshan karhade avb

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या