scorecardresearch

“तुम्हारे शरण मे तांबडे बाबा, येतोय मार्तंड जामकर…”, ‘देवमाणूस २’ मालिकेत नवा ट्विस्ट, प्रोमो व्हायरल

या मालिकेत लवकरच एका मार्तंड जामकर नावाच्या पोलीस पात्राची एंट्री होणार आहे. अ

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून ‘देवमाणूस’ला ओळखले जाते. ‘देवमाणूस’ या मालिकेने ऑगस्ट २०२१ ला प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर काही महिन्यांतच या मालिकेच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली. या मालिकेच्या दुसऱ्या पर्वालाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. काही दिवसांपूर्वी डिंपल आणि डॉ अजितकुमार देव या दोघांचे लग्न निर्विघ्न पार पडले आहे. एकीकडे सर्वत्र आनंद असताना दुसरीकडे आता या मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे. या मालिकेत लवकरच एका मार्तंड जामकर नावाच्या पोलीस पात्राची एंट्री होणार आहे. अभिनेते मिलिंद शिंदे ही मार्तंड जामकर ही भूमिका साकारत आहेत. नुकतंच याचा प्रोमो समोर आला आहे.

झी मराठीने नुकतंच त्यांच्या इन्स्टाग्रामवर याबाबतचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोत डॉक्टर अजितकुमार हा बाजारात नवे सावज शोधण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. तो एका बाईला टोमॅटो उचलून देताना दिसत आहे. ती बाई निघून जाते तेव्हा डॉक्टर तिला बघून ब्यूटीफूल असे म्हणतात. त्यानंतर पाठीमागे मार्तंड जामकर हे पोलिसाच्या वेशात पाहायला मिळत आहेत. ते त्याला बघून नजर हटी…, असे म्हणताना दिसत आहे. सध्या हा प्रोमो प्रचंड चर्चेत आहे.

Sher Shivraj Box Office Collection : अवघ्या दोन दिवसात ‘शेर शिवराज’ ठरला सुपरहिट, पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी

त्यासोबतच देवमाणूस २ या इन्स्टाग्राम पेजवरुन मिलिंद शिंदे यांचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. त्यांचा हा फोटो जुनी मालिका तू तिथे मी मधला आहे. या फोटोत त्यांच्या समोर अजितकुमार देवच्या फोटोला हार घातलेला दिसत आहे. नैन तुम्हारे दर्पण मेरा, अब तो दर्शन दे दो बाबा, तुम्हारे शरण में तांबडे बाबा, येतोय मार्तंड जामकर…, असे कॅप्शन या फोटोला देण्यात आले आहे. त्यांचा हा फोटो आणि मालिकेचा नवा प्रोमो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Video : “आता तू यांचा सांभाळ कर…”, लेकासोबत IPL सामना पाहिल्यावर रितेश देशमुखचा जिनिलियाला सल्ला

मार्तंड जामकरमुळे अजितकुमार समोर कोणकोणती नवीन आव्हान उभी राहणार? अजितकुमारचा चांगुलपणाचा मुखवटा फाटला जाईल का? त्याचा खरा चेहरा गावकऱ्यांसमोर येईल का? हे प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे. दरम्यान अभिनेते मिलिंद शिंदे यांनी आपल्या उत्तम अभिनय कौशल्याने प्रत्येक भूमिकेची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडली आहे. त्यामुळे मार्तंड जामकर ही भूमिका ते कशाप्रकारे साकरतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Zee marathi serial devmanus 2 new twist milind shinde to play martand jamkar police role nrp

ताज्या बातम्या