scorecardresearch

‘देवमाणूस २’ मालिकेत थरारक वळण; स्वतःच्या फायद्यासाठी डॉक्टर खेळणार नवा डाव!

‘देवमाणूस २’ मालिकेतील हा व्हिडीओ बराच चर्चेत आहे.

devmanus serial, devmanus 2, devmanus upcoming episode, devmanus new promo, kiran gaikwad, देवमाणूस मालिका, देवमाणूस २, किरण गायकवाड, देवमाणूस २ प्रोमो
पैशाच्या लोभासाठी डॉक्टर नवा डाव आखताना दिसणार आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून ‘देवमाणूस’ला ओळखले जाते. ‘देवमाणूस’ या मालिकेने ऑगस्ट २०२१ ला प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी या मालिकेच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली असून त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मात्र आता लवकरच या मालिकेत एक नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. या आठवड्यात या मालिकेचा एक तासाचा विशेष भाग दाखवला जाणार आहे. ज्यात पैशाच्या लोभ आणि स्वतःच्या फायद्यासाठी डॉक्टर नवा डाव आखताना दिसणार आहे.

‘देवमाणूस २’च्या विशेष भागाचा प्रोमो नुकताच प्रसारित झाला. ज्यात डॉक्टर अजितकुमार सोनू आणि तिच्या आईकडून पैसे उकळण्यासाठी नवा डाव आखताना दिसत आहे. तो काही माणसांना सोनूच्या घरी पाठवून तिला वेठीस धरून ठेवण्यास आणि जमिनीच्या कागदपत्रांवर तिच्या आईकडून सह्या केल्या गेल्या नाही तर मुलीला मारुन टाकण्याची धमकी देण्यास सांगतो. या प्रसंगाने सोनूची आई घाबरुन जाते आणि शेजाऱ्यांची मदत मागते. त्यावर तिच्या शेजारचे लोक तिला डॉक्टरची मदत घेण्याचा सल्ला देतात ज्यामुळे सोनूची आई डॉक्टरकडे स्वतःहून पोहोचते.

आणखी वाचा : Video- जेव्हा ६ वर्षांनंतर आर्ची- परश्यानं ‘सैराट’चा ‘तो’ सीन केला रिक्रिएट, व्हिडीओ एकदा पाहाच

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे आता आजच्या १ तासाच्या विशेष भागात मालिकेमध्ये थरारक घडामोडी घडताना दिसणार आहेत यात शंका नाही. प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये या एपिसोडविषयी बरीच उत्सुकता असल्याचं दिसत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Zee marathi serial devmanus 2 upcoming 1 hour episode promo video goes viral mrj

ताज्या बातम्या