scorecardresearch

‘तुझ्या माझ्या संसाराला…’ फेम अमृता पवार अडकली विवाहबंधनात, लग्नाचा व्हिडीओ पाहिलात का?

अमृताने नील पाटीलसोबत लग्नगाठ बांधत नव्या संसाराला सुरुवात केली आहे.

amruta pawar marraige
अमृता पवार नील पाटील

झी मराठीवरील एकत्र कुटुंब पद्धतीचं दर्शन घडवणारी ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. या मालिकेतील अदिती आणि सिद्धार्थ ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या मालिकेत अदितीची भूमिका अभिनेत्री अमृता पवार साकारताना दिसत आहे. अमृताने अल्पावधीतच अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घातली. नुकतंच अमृता ही विवाहबंधनात अडकली आहे. अमृताने नील पाटीलसोबत लग्नगाठ बांधत नव्या संसाराला सुरुवात केली आहे.

अमृता पवार ही इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असते. अमृता आणि नीलचा विवाहसोहळा बुधवारी पार पडला. तिच्या या विवाहसोहळ्याचे काही खास क्षण तिने चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. अमृताने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत तिच्या हळदीपासून लग्नापर्यंतची धामधूम पाहायला मिळत आहे. यात तिच्या लग्नाचे काही निवडक क्षण पाहायला मिळत आहेत. तसेच तिच्या लग्नात मित्र मैत्रिणी, कुटुंबाने केलेल्या गंमतीजमतीही दिसत आहेत.

Photos : ‘तुझ्या माझ्या संसाराला…’ फेम अमृताची लगीनघाई; हळदी समारंभाचे फोटो पाहा

या लग्नाचा व्हिडीओ पोस्ट करताना तिने त्याला हटके कॅप्शन दिले आहे. एक पाऊल पुढे…, असे अमृताने या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे तिच्या अनेक मित्र मैत्रिणी आणि उपस्थित लोकांनी त्यांच्या लग्नाचे फोटोही शेअर केले आहेत. या फोटोत अमृता ही फार सुंदर दिसत आहे. तिने लग्नाच्या वेळी पिवळ्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली होती. तर रिसेप्शनच्या वेळी तिने छान डिझाईनर साडी नेसली होती.

पाहा व्हिडीओ –

Photos : ‘तुझ्या माझ्या संसाराला…’ फेम अमृताची लगीनघाई; हळदी समारंभाचे फोटो पाहा

काही दिवसांपूर्वी त्या दोघांचा हळदी सभारंभा पार पडला होता. यात ते दोघेही हळदीच्या रंगात रंगल्याचे पाहायला मिळत होते. अमृता-नीलचा साखरपुडा एप्रिल महिन्यात पार पडला होता. दरम्यान अमृताने सोनी मराठीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ आणि ‘जिगरबाज’ या मालिकेत काम केले होते. पण ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’या मालिकेमुळे तिला खरी ओळख मिळाली.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Zee marathi serial tuzya mazya sansarala ani kay hav fame actress amruta pawar tie knot with neel patil nrp

ताज्या बातम्या