छोट्या पडद्यावर एकापेक्षा एक असे भन्नाट कार्यक्रम आपण पाहतो. आता प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी झी मराठी एक वेगळा कार्यक्रम घेऊन आले आहेत. या कार्यक्रमाचं नाव ‘बँड बाजा वरात’ आहे. लग्न स्थळी झी मराठीने त्यांच्याकडून नव्या दांपत्याला आहेर पोहोचवला आहे. पण झी मराठीने नक्की असं का केलं असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

झी मराठीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत वधू-वर लग्न बंधनात अडकल्याचे दिसते. त्यानंतर ते लग्नाच्या हॉलमधून बाहेर येतात आणि झी मराठीच्या ‘बँड बाजा वरात’ कडून मिळालेला आहेर स्विकारतात. हा व्हिडीओ शेअर करत “बँड बाजा वरात, झी मराठीचा आहेर थेट लग्न मंडपात. बार्शीतील नवदांपत्य ऋतुजा आणि प्रदीप यांना झी मराठीकडून आणि देवमाणूसच्या टीमकडून लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा”, असे कॅप्शन त्यांनी दिले आहे. तर देवमाणूस मालिकेतील डिम्पल आणि डॉ.अजितकुमार देव यांनी ‘बँड बाजा वरात’ या कार्यक्रमात नुकतीच हजेरी लावल्याचे म्हटले जाते.

IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: डगआऊटमधून रिव्ह्यूसाठी सूचना; टीम डेव्हिडचं ‘ब्रेनफेड मोमेंट’, पाहा VIDEO
a young boy denied entry to bank of India branch for wearing shorts video goes viral
Nagpur Video: हा कोणता नियम! शॉर्ट पॅन्टमुळे बँकेत No Entry; नागपूरच्या तरुणाचा व्हिडीओ होतोय व्हायरल..
Bengaluru woman slammed for phone
स्कुटर चालवताना मोबाईलवर बोलण्यासाठी काकूंचा हटके जुगाड! व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच
Wedding Video
नवरी होती स्टेजवर अन् हेल्मेट घालून आला प्रियकर, लग्न मंडपात नवरदेवाला ढकलून केलं असं काही…; व्हिडिओ झाला व्हायरल

आणखी वाचा : ‘धर्मवीर’ चित्रपटात बाळासाहेबांची भूमिका साकारणारा अभिनेता, कोण आहे माहितीये का?

आणखी वाचा : प्रियांका चोप्राने मुलीला दिले भारतीय नाव!

अल्पावधीतच या कार्यक्रमाने प्रचंड लोकप्रियता मिळविली आहे. हा शो सतत आपल्या हटके उपक्रमामुळे चर्चेत असतो. या शोमध्ये हिंदी-मराठी चित्रपटांमधील लोकप्रिय अभिनेत्री रेणुका शहाणे होस्टच्या भूमिकेत दिसून येत आहे. रेणुकाला साथ देण्यासाठी ‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेम अभिनेता पुष्कराज चिरपुटकरसुद्धा आहे.