“…तर आम्ही भाजपावाले आणि देवेंद्र फडणवीस”, किचन कल्लाकारमध्ये रामदास आठवलेंनी दिला अजित पवारांना सल्ला

रामदास आठवले यांनी त्यांच्या पत्नीसह किच्चन कल्लाकारमध्ये हजेरी लावली होती.

kitchen kallakar promo, ramdas athawale, ajit pawar, bjp,
रामदास आठवले यांनी त्यांच्या पत्नीसह किच्चन कल्लाकारमध्ये हजेरी लावली होती.

झी मराठीवरील ‘किचन कल्लाकार’ हा कार्यक्रम घराघरात प्रसिद्ध आहे. एक लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ‘किचन कल्लाकार’ कडे पाहिलं जातं. या कार्यक्रमात आतापर्यंत अनेक कलाकार, नेते मंडळी सहभागी झाले आहेत. ‘किचन कल्लाकार’च्या येत्या भागात आपल्या मिश्किल कवितांमुळे नेहमीच चर्चेत असणारे रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले सहभागी होणार आहेत. यावेळी रामदास आठवले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना एक सल्ला दिला आहे.

आणखी वाचा : “साहेब, तुमच्या यादीत महाराष्ट्र हित चौथ्या क्रमांकावर…”; सुमीत राघवनने एकनाथ शिंदेंच्या ट्वीटवर दिली प्रतिक्रिया

झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात रामदास आठवलेंना अजित पवार यांचा फोटो दाखवला जातो. हा फोटो पाहून आठवले लगेच कविता ऐकवतात. “जे करतात अनेक वेळेला वादा…अन् पुरा करत नाहीत ते आहेत अजित दादा…”, अशा शब्दांत ते अजित दादांची ओळख करून देतात. तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? असा प्रश्न केल्यावर आठवले म्हणतात, “त्यांना सल्ला आमचा एवढाच आहे की, शिवसेनेला दिलेला पाठींबा त्यांनी ताबडतोब काढावा…त्यांनी पाठींबा काढला की आम्ही भाजपावाले, देवेंद्र फडणवीस…आम्ही तर तयारच बसलो आहोत…”

आणखी वाचा : वडील अभिषेकचा डान्स कसा वाटला? मनिष पॉलच्या प्रश्नावर आराध्याने दिले असे उत्तर

आणखी वाचा : …म्हणून ‘धर्मवीर’ चित्रपटातील शेवटचा ‘तो’ सीन होतोय व्हायरल

झी मराठीवरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘किचन कल्लाकार’ हा सर्वात जास्त लोकप्रिय आहे. या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. ललित प्रभाकर, सोनाली कुलकर्णी, अमेय वाघ, शुभा खोटे, संजय मोने, संजय नार्वेकर अशा अनेक मंडळींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तसेच अनेक राजकीय मंडळींना सुद्धा या कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. यात पंकजा मुंडे, चित्र वाघ, किशोरी पेडणेकर, रुपाली ठोंबरे, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस अशा अनेकांनी सहभाग घेतला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Zee marathi show kitchen kallakar new promo ramdas athawale gives suggestion to ajit pawar dcp

Next Story
“शिकारीला निघालेल्या लोकांची कधी कधी…” हेमांगी कवीच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी