‘तुला पाहते रे’ मालिकेचा हिंदी रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

या मालिकेचे प्रोमो पाहता ही मालिका ‘तुला पाहते रे’ या मालिकेचा रिमेक असल्याचे बोललं जात आहे.

‘तुला पाहते रे’ ही छोट्या पडद्यावरील मालिका अल्पावधीत लोकप्रिय ठरली होती. सुबोध भावे आणि गायत्री दातार यांची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली. झी मराठी वाहिनीवरील या मालिकेचा हिंदी रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘तेरे बिन जिया जाए ना,’ असे या मालिकेच्या हिंदी रिमेकचे नाव आहे. ही मालिका ‘झी टिव्ही’ वाहिनीवर प्रक्षेपित केली जाणार आहे. ‘तुला पाहते रे’ या मालिकेचा रिमेक आतापर्यंत सहा ते सात भाषेत करण्यात आला आहे.

‘तेरे बिन जिया जाए ना,’ या मालिकेचा प्रोमो सध्या युट्यूबवर ट्रेंडीगवर असल्याचे पाहायला मिळत आहे. येत्या ९ नोव्हेंबरपासून झी टीव्हीवर ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचे प्रोमो पाहता ही मालिका ‘तुला पाहते रे’ या मालिकेचा रिमेक असल्याचे बोललं जात आहे.

‘तेरे बिना जिया जाये ना’ या मालिकेचे कथानक एका काल्पनिकेतवर आधारित आहे. कृशाल चतुर्वेदी ही एक साधी मुलगी अंबिकापूरच्या एका भव्य वाड्यात येते. यावेळी तिच्या स्वप्नातील राजकुमार म्हणजे देवराज सिंह ठाकूरसोबत ती नवीन आयुष्याची सुरुवात करते. देवराज हा अंबिकापूर राजघराण्याचा वारस आहे. तो एका राजेशाही शैलीत राहताना दिसत आहे. तर या मालिकेतील जया माँ ही अंबिकापूरच्या राजघराण्याची माता आहे. काही वर्षांपूर्वी ती राजवाड्याची काळजीवाहू म्हणून या घरात राहत होती. पण त्यानंतर काही वर्षांनंतर देवराजचे वडील वीरेंद्र सिंह राठोड यांनी तिला बहिणीसारखे मानले. वीरेंद्र सिंह राठोड यांच्या निधनानंतर जया माँ राठौर हवेलीच्या प्रभारी बनल्या, असे या मालिकेच्या प्रोमोत पाहायला मिळत आहे.

दरम्यान झी मराठीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेत सुबोध भावेने साकारलेली विक्रांत सरंजामेची भूमिका आणि गायत्री दातारने साकारलेली ईशा निमकरची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. वय विसरायला लावतं ते खरं प्रेम असं म्हणणारी ‘तुला पाहते रे’ ही मालिका आहे ईशा आणि विक्रम सरंजामे यांच्या प्रेमाची कहाणी या मालिकेत दाखवण्यात आली होती.

वय विसरायला लावणाऱ्या विक्रांत-ईशाच्या प्रेमकहाणीने तरुणाईलाही वेड लावलं. गायत्रीने या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आणि पदार्पणातील तिच्या या भूमिकेने खूप लोकप्रियता मिळवली. यानंतर आता या मालिकेचा हिंदी रिमेक सुपरहिट ठरणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Zee marathi tula pahate re marathi serial hindi remake promo viral nrp

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन