Raj Kundra Case: “तरुणांनाही अंर्तवस्त्र काढून न्यूड ऑडिशन देण्यास सांगितलं जातं”, जोया राठोडचा खुलासा

तसंच राज कुंद्राला बॉलिवूडप्रमाणे पॉर्न इंडस्ट्रीला मोठं बनवाचं होतं असं जोया म्हणाली.

zoya-rathore-raj-kundra. (1)
(Photo-Instagram@Zoya Rathore/Raj Kundra

राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात रोज नवनवे धक्कादाय खुलासे समोर येत आहे. शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक झाल्यापासूनच अनेक मॉडेल आणि अभिनेत्रींनी पुढे येत राज कुंद्रावर आरोप केले आहेत. यातच आता राज कुंद्राच्या हॉटशॉट अ‍ॅपसाठी आणि अडल्ट सिनेमांमध्ये काम करणारी अभिनेत्री जोया राठोडने काही धक्कादायक खुलासे केले आहेत. काही वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत जोयाने ती राज कुंद्राला कधीही भेटली नसली तरी त्याचा सहकारी उमेश कामतने तिला न्यूड ऑ़डिशन देण्यास सांगितलं होतं. हॉटशॉट अ‍ॅपसाठी त्याने व्हाटस्अपवर व्हिडीओ पाठवण्यास सांगितलं होतं मात्र यासाठी जोयाने नकार दिला.

जोया म्हणाली, “मी कधी राज कुंद्राला भेटले नाही किंवा त्याच्याशी बोलले नाही. मात्र त्याच्या ऑफिसमधून उमेश कामतचा फोन आला आणि त्याने तो हॉटशॉट अ‍ॅपचं काम सांभाळत असल्याचं म्हणाला. ” असं जोयाने सांगितलं. अश्लील सिनेमात काम करण्यासाठी उमेशने दररोज २० हजार रुपये मिळतील अशी ऑफर झोयाला दिली होती. अटक होईपर्यंत तो झोयाला सतत कॉल करत होता.

हे देखील वाचा: “न्यूडिटीकडे कला म्हणून पाहिलं गेलं पाहिजे”; पूनम पांडेने सांगितला पॉर्नोग्राफी आणि न्यूडिटी मधला फरक

तसचं हॉटशॉट अ‍ॅपसाठी काम करणाऱ्या एका रॉय नावाच्या व्यक्तीने देखील झोयाला अश्लील सिनेमांमध्ये काम करण्यासाठी फोन केल्याचं ती म्हणाली रॉयने झोयाला दररोज ७० हजार रुपये मिळतील अशी ऑफर दिली. महत्वाचं म्हणजे राज कुंद्राच्या कंपनीत पुरुषांचं देखील शोषण होत असल्याचा खुलासा जोयाने केलाय.

हे देखील वाचा: “पार्टीसाठी सगळे एकत्र येतात मग आता…” शिल्पा शेट्टीला पाठिंबा देत दिग्दर्शकाने सेलिब्रिटींना सुनावलं

राज कुंद्राच्या कंपनीत पुरुषांचही शोषण

ती म्हणाली, “या इंडस्ट्रीमध्ये पुरुषांचंदेखील शोषण केलं जातं. जे तरुण अगंप्रदर्शन करण्यास तयार नसतात त्यांना काम मिळत नाही. मालिकांमध्ये, नाटकांमध्ये काम करणारी अनेक तरुण मुलं ऑडिशनसाठी येतात. त्यांना सांगितलं जातं जर त्यांनी अंतर्वस्त्र काढून सीन नाही दिला तर त्यांना काम मिळणार नाही. फोनवर मुलांना ५ हजार मिळतील असं सांगून नॉर्मल ऑडिशनसाठी बोलावलं जातं. मात्र जेव्हा ते ऑडिशन द्यायला येतात तेव्हा त्याना खरा सेक्स सीन दिला तर १५ हजार मिळतील असं थेट सांगितलं जातं. ” असा खुलासा जोयाने केलाय. या मुलांना पॉर्न इंडस्ट्री वेगाने वाढत असून तुम्ही सुपरस्टार बनाल असं स्वप्न दाखवलं जात असल्याचं जोया म्हणाली.

तसंच राज कुंद्राला बॉलिवूडप्रमाणे पॉर्न इंडस्ट्रीला मोठं बनवाचं होतं असं जोया म्हणाली. अनेक तरुण तरुणींचा वापर करून आपलं नाव कुठेही पुढे न येता राज कुंद्राला बॉलिवूडप्रमाणे पॉर्न क्षेत्र मोठं बनवायचं होतं असा खुलासा जोयाने केलाय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Zoya rathore reveals umesh kamat demand nude auditions in porn industry men also suffers kpw

ताज्या बातम्या
फोटो गॅलरी