श्रीगोंदवलेकर महाराज यांचे एक वचन आपण पाहत आहोत. ते म्हणतात की, ‘‘मुक्ती लाभल्यानंतरही जर काही कर्तव्य उरत असेल तर ते नामस्मरणच!’’ आता जगतानाच मनानं मुक्त झाल्याची स्थिती इथं अभिप्रेत आहे. जो मनानं खऱ्या अर्थानं मुक्त झाला त्याला ‘मी मुक्त झालो,’ हे भान उरलं असेल तर तो खऱ्या अर्थानं मुक्त नाही! उलट ‘आता मी कुणी तरी झालो,’ या भ्रमानं पछाडून, ‘लोकांना तारण्याची जबाबदारी जणू आपल्याच शिरावर आहे, नव्हे त्यासाठीच आपला जन्म झाला आहे,’ या भावनेनं तो अध्यात्माच्या नावाखाली अधिक घातक प्रपंचातच रुतून बसेल! तेव्हा मुक्त ‘झालो’ असं ज्याला वाटतं त्यानंही काही करायचंच असेल तर नामस्मरणच करावं, असं महाराज सांगत आहेत. आता गेल्या भागात सांगितलं त्यानुसार नामाचा प्रभाव इतका व्यापक आहे की, ज्याचं नाम मनात रुजलं आहे त्याची जीवनप्रेरणाही अंतकरणात उमलते. मग संकुचित जगण्याचा परीघ व्यापक होतो. रामाच्या नावावर रामाशिवाय अन्य काहीच साधायचं नसेल तर जीवन पशुवत राहूच शकत नाही. तेव्हा श्रीसद्गुरूंच्या गुणगानाचा आणि कीर्तनाचा छंद मला लागणं म्हणजे ज्या व्यापक परमभावात स्थित राहून ते सर्व जीवनव्यवहार सहजतेनं आणि निश्चिंत वृत्तीनं पार पाडतात तसं जगण्याची ओढ मनात उत्पन्न होणं. त्यासाठी संकुचित जगणं ओसरत जाऊन जीवनदृष्टी अधिक व्यापक होत जाणं. माझ्या हिताकरिता त्यांनी जे जे सांगितलं ते ते आचरणात आणण्याचा अभ्यास करायची गोडी लागणं! या सर्वाचं अर्थात आपल्या जीवनाच्या आध्यात्मिक ध्येयाचं सतत स्मरण राहण्याचा उपाय म्हणून नामोच्चार आहे. ते नाम जसजसं खोल जाऊ लागेल तसतसं त्या ध्येयाशिवाय जगात अन्य कशालाच महत्त्व उरणार नाही. माझ्या जगण्यावर या एका ध्येयाचाच प्रभाव उरेल, तेव्हा सलोकतेची स्थिती येईल आणि त्या ध्येयाशी आंतरिक एकरूपता साधू लागेल तेव्हा समीपतेची स्थिती अनुभवता येईल! श्रीसद्गुरूंच्या बोधावर, त्या बोधानुरूप जगण्यावर वृत्तिविश्वास दृढ झाला की जगण्यातील समस्त द्वंद्व, समस्त द्वैत मावळेल! तर जेव्हा श्रीसद्गुरूंच्या बोधानुरूप जगण्यालाच सर्वोच्च महत्त्व येईल, तेव्हाच त्यांचं सामीप्य, त्यांचा सहवास अंतरंगातून जाणवू लागेल. हे सर्व मनाच्याच कक्षेत आहे. कारण मनाच्या धारणेनुसारच आपली जीवनधारणा  ठरत असते. ही धारणा बदलली की जगणं बदलतं. जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. आधी ‘मी’पणाचीच जपणूक आणि ‘मी’चीच महत्ता प्रस्थापित करण्याला सर्वोच्च महत्त्व होतं. त्यामुळे जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही ‘मी’केंद्रितच होता. मूळ धारणाच बदलू लागेल तसतसा ‘मी’ मावळू लागेल किंवा ‘मी’पणाची धार बोथट होऊ लागेल. त्याजागी ‘तू’पणाचा उदय होत जाईल! अर्थात आपलं जीवन, आपलं अस्तित्व या विराट चराचराच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे, ही जाणीव होऊ लागेल. हे विराट अस्तित्व या ‘तू’च्या परम सत्तेच्या आधारावर टिकून आहे आणि या परम सत्तेशी, परम शक्तीशी एकरूप असा श्रीसद्गुरूच आहे, ही धारणा होईल. मग त्यांचा बोध अर्थात त्यांचा विचार आत्मसात करण्याचा सतत प्रयत्न सुरू होईल. मग त्यांचा विचार तोच माझा जीवनविचार होईल. त्यांची धारणा तीच माझी जीवनधारणा होईल. त्यांचं ध्येय तेच माझं जीवनध्येय होईल. समर्थ सांगतात त्याप्रमाणे, ‘‘करी रूप स्वरूप सर्वा जिवांचें। करी छंद निर्द्वद हे गुण गातां। हरीकीर्तनीं वृत्तिविश्वास होतां॥’’ ही ती स्थिती आहे. अशी श्रीसद्गुरूंशी एकरूप स्थिती झाल्यावर काय होईल? कुठलीच कामना उरणार नाही! आणि तरीही जर काही कामना उरली असेलच, तर श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात त्याप्रमाणे, ‘‘मुक्ती लाभल्यानंतरही काही कर्तव्य उरले असेल तर ते नामस्मरणच!’’

-चैतन्य प्रेम

kolhapur lok sabha marathi news, sanjay mandlik kolhapur marathi news
कोल्हापूरच्या आखाड्यात दत्तक प्रकरण तापणार ?
kolhapur lok sabha seat, Sanjay Mandlik, Clarifies Controversial, against shahu maharaj, opponents deliberately distorted statement, shahu maharaj adopted statement, kolhapur shahu maharaj, shivsena, congress,
माफी मागायचा प्रश्नच नाही; दत्तक वारस विरोधातील उग्र जनआंदोलनाचा इतिहास जाणून घ्यावा – संजय मंडलिक
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती
With the blessings of Udayanaraj i got more strength says shivendrasinh raje
सातारा: महाराजांच्या आर्शिवादाने मला दहा हत्तीचे बळ- शिवेंद्रसिंहराजे