प्रल्हादानं अनन्यभक्ताचं अंतरंग कसं असतं, तेच उघड केलं आहे. तो आपला साधनपथावरचा आदर्श असला पाहिजे. आणखी एक विलक्षण गोष्ट पहा.. हिरण्यकशिपूनं घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेत वर मागितलाच होता. या चराचरातला कुणीही मानव, दानव वा पशू मला कधीही मारू शकणार नाही, इतकं मोठं कवच त्या वरानं त्यानं प्राप्त केलं होतं. त्या वरानं तिन्ही लोकांवर त्याची अर्निबध सत्ता सुरू झाली, पण अखेर? अखेर दैन्यवाणीच झाली आणि त्याचाच पुत्र प्रल्हाद! यानं एकही वर मागितला नाही, पण आपल्या भक्तिप्रेमानं त्यानं भगवंतालाच कायमचं अंकित केलं.. मग तिन्ही लोकांवर त्याच्या प्रेमाची सत्ता आहे, यात काय आश्चर्य? तेव्हा एकानं वर मागून स्वत:चा घात करून घेतला आणि एकानं वर मागण्यातच भक्ताच्या आध्यात्मिक जीवनाचा कसा अंत आहे, हे दाखवून दिलं! रामाशिवाय अन्य काही कामना आहेत का? मग तुम्ही या घडीला भक्त म्हणून वावरत असलात तरी तुमच्या आध्यात्मिक जीवनाची अखेर दैन्यवाणी होण्याचा धोका आहे, हेच प्रल्हाद शिकवत आहे. इथंच ‘मनोबोधा’च्या पुढील म्हणजे ९७व्या श्लोकाचा सांधा चपखल जुळतो आहे. हा श्लोक, त्याचा प्रचलित अर्थ प्रथम पाहू. मग मननार्थाकडे वळू. हा श्लोक असा आहे :

मुखीं नाम नाहीं तया मुक्ति कैंची।

Investment Management in Wartime, wartime, Investment Management, Financial Uncertainty, Surviving Financial Uncertainty, Minimize Losses, Volatility, share market, stock market, mutual funds, returns, profit, loss, sell,
युद्धसदृश काळातील गुंतवणूक व्यवस्थापन
reservation in indian constitution to bring equality in society
संविधानभान : समतेची बिकट वाट
Blood Pressure drug
रक्तदाबाची औषधे मधेच बंद केल्याने तुम्हाला अधिक नुकसान होऊ शकते? काय सांगतात डाॅक्टर… 
Budh Vakri 2024
आजपासून ‘या’ ५ राशींचे लोक होतील भाग्याचे धनी? बुधदेवाच्या कृपेने उत्पन्नात होऊ शकते प्रचंड वाढ

अहंतागुणें यातना ते फुकाची।

पुढें अंत येईल तो दैन्यवाणा।

म्हणोनी म्हणा रे म्हणा देवराणा।। ९७ ।।

प्रचलित अर्थ : ज्याच्या मुखात भगवंताचे नाम नाही त्यावर भगवंताचा कृपाप्रसाद कुठून होणार? हिरण्यकशिपूनं चित्तात अहंकार बाळगल्यानं त्याला नाहक क्लेश मात्र भोगावे लागले. अशांना पुढे दैन्यवाणे मरण येणारच असते म्हणून आज देवाचे नाम मुखी घ्या.

आता मननार्थाकडे वळू. गेल्या ९६व्या श्लोकाचे पहिले दोन चरण हे प्रल्हादाची नित्यसाधनामय स्थिती मांडणारे होते (महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकुळीं। जपे रामनामावळी नित्यकाळीं।।). तर अखेरचे दोन चरण हे हिरण्यकशिपूचा अहंमन्यतेनं कसा आत्मघात केला, ते मांडणारे होते (पिता पापरूपी तया देखवेना। जनीं दैत्य तो नाम मूखें म्हणेना।।). आणि आपण हेही पाहिलं की ‘प्रल्हाद’ आणि ‘हिरण्यकशिपू’ या आपल्याच दोन अवस्था आहेत! अर्थात आपण ‘प्रल्हादा’च्या दिशेनं जाऊ  शकतो किंवा ‘हिरण्यकशिपू’देखील होऊ  शकतो!

पण या मधली जी अवस्था आहे ना, ती फार घातक आहे. त्या अवस्थेचंच वर्णन गेल्या श्लोकातला अखेरचा चरण मांडतो.. ‘जनीं दैत्य तो नाम मूखें म्हणेना!’ म्हणजे सज्जनांमध्ये वावर असूनही आपला आसुरभाव काही ओसरत नाही, आपल्या अंत:करणाची दारं काही भगवंतासाठी उघडत नाहीत! आणि हीच स्थिती फार त्रासदायक असते. ‘साधक’ म्हणून तर म्हणवून घेत आहोत, पण साधनेचा आनंद नाही. ओढा जगात संकुचित कामना पूर्ण करून घेण्याकडेच आहे. अज्ञान-मोहजन्य भ्रामक इच्छांमध्येच आहे. पुण्यकर्मात मन रमत नाही आणि इच्छा असूनही पाप करवत नाही! मग, आम्ही इतकी साधना करूनही दु:ख भोगतो आहोत आणि काही जण पापकर्मात सदैव रत असूनही सुखात आहेत, इकडे लक्ष जातं! भगवंतापेक्षा जगाचा प्रभाव मनावर प्रकर्षांनं होत असल्यानं साधनेचा आधार क्षीण होत जातो. मग अशा साधकाची अखेर म्हणजे पुढची वाटचाल किती दैन्यवाणी होते, हे आता हा ९७वा श्लोक सांगतो आहे!