श्रीसमर्थ रामदास स्वामी यांच्या ‘मनोबोधा’च्या ३० व्या श्लोकाकडे आपण आता वळणार आहोत. हा श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ प्रथम पाहू.

समर्थाचिया सेवका वक्र पाहे।

Govinda stopped the fleet of vehicles and bought shoe from small shop
गोविंदाला बुटाची भुरळ! रोड शो थांबवून खरेदी केले बूट; किंमत ऐकून तुम्ही म्हणाल…
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
kolhapur, cracks on ambabai mahalaxmi idol
अंबाबाई – महालक्ष्मी मूर्तीवर तडे, तातडीने संवर्धन गरजेचे; पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या पाहणी अहवालात निष्कर्ष
MLA Ram Satpute criticizes Sushilkumar Shinde on the issue of Hindutva
“…म्हणूनच सुशीलकुमारांच्या मुखातून हिंदू दहशतवाद शब्द निघाला”, आमदार राम सातपुते यांचे टीकास्त्र

असा सर्व भूमंडळी कोण आहे?

जयाची लिळा वर्णिती लोक तिन्ही।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी।।३०।।

प्रचलित अर्थ : परमसमर्थ अशा या राघवाच्या सेवकाकडे वाकडय़ा नजरेनं पाहील, असा या त्रिभुवनात कोण आहे? ज्या रामाची लीला स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकांतील देव, मानव आणि दानवही गातात, तो राम आपल्या दासाची कदापि उपेक्षा करीत नाही.

आता मननार्थाकडे वळू. या श्लोकातून समर्थामधील  मानसशास्त्रज्ञाचीच प्रचीती येते!  माणूस राघवाच्या या अनंत पंथावर जे पहिलं पाऊल टाकतो त्यामागचं मानसशास्त्रीय रहस्यच यात प्रकटलं आहे. जगातल्या कुणालाही आपल्याकडे वाकडय़ा नजरेनं पाहता येऊ नये, हे ते मूळ सुप्त कारण आहे! आत्मसाक्षात्कार, परमात्म्याचं दर्शन आदी कारणं आपण सांगतो. पण या साक्षात्काराचा हेतू आपलं जीवन सुखाचं, अडचणींविरहित व्हावं हाच असतो. जग हाच आपल्या सुखाचा आधार असतो. त्यामुळे या जगात अखंड सुखच हवं असेल तर दु:खं वाटय़ाला येऊच नये, ही आपली इच्छा असते. त्यामुळे अनंत अशा राघवाच्या पंथावर आपण पाऊल टाकतो ते आपल्या अनंत इच्छांची सहज पूर्तता व्हावी यासाठीच! जग आपल्या मनाजोगतं झालं, जगानं आपल्याला विरोध केला नाही की, जगणं आनंदाचं होईल आणि त्यासाठी परमात्म्याच्या शक्तीचा आधार आपल्याला हवा असतो. त्या आधाराच्या आशेचा किरण या श्लोकातून गवसत असल्याने प्रारंभिक अवस्थेतल्या साधकाला हा श्लोक जी उमेद देतो तिला तोड नाही. मात्र इथेच खरी मेख आहे. अगदी थोडय़ा गुंतवणुकीच्या बदल्यात मोठा आर्थिक लाभ देणाऱ्या योजनांच्या मोठमोठय़ा जाहिराती असतात ना! त्या जाहिरातीच्याच तळाशी एक अगदी लहानशी, दिसेल न दिसेलशी ओळ असते. ती वाचली तरी, हा लाभ मिळणं प्रत्यक्षात किती कठीण आहे, हे समजतं! पण ती ओळ स्वप्नाळू डोळ्यांना दिसते कुठे? श्रीसद्गुरूंची ग्वाही मात्र असा चकवा देणारी नसते. म्हणूनच ‘जगातला कुणीही तुमच्याकडे वाकडय़ा नजरेनं पाहणार नाही, ही मोठी ग्वाही देण्याआधीच हा लाभ कोणाला मिळणार हे समर्थ अगदी स्पष्टपणे, ठसठशीतपणे सांगतात. समर्थाचिया सेवका! समर्थाचा जो सेवक आहे, त्याला हे कवच आहे! रामरक्षेतला श्लोकही अगदी असाच आहे ना? त्यातही हीच ग्वाही आहे : ‘पातालभूतलव्योम चारिणश्छद्मचारिण: न द्रष्टुम् अपि शक्तास्ते रक्षितं रामनामभि:।।’ म्हणजे श्रीराघवाचा जो अनन्य भक्त आहे, रामनामाशी जो अनन्य आहे त्याच्याकडे पाहण्याची शक्तीदेखील पाताळ भूमी किंवा अंतरिक्षातील छद्मी अर्थात कपटी लोकांमध्ये नसते. जिथं पाहण्याचीदेखील शक्ती नाही तिथं वाकडय़ा नजरेनं पाहणं दूरच! पण हा लाभ अनन्यासाठी आहे! त्याच्यासाठी हा राघव, हा सद्गुरू ‘आपदाम पहर्तारं। दातारम् सर्वसम्पदाम्।।’ आहे. आपदांचं, संकटांचं अपहरण करणारा आणि सर्व संपदा देणारा आहे. या राघवाचं, या सद्गुरूचं गुणगान तिन्ही लोक करतात. अर्थात तिन्ही लोकांत श्रीसद्गुरूंची महत्ता आहे. त्यांचा जो सेवक आहे त्याकडे वाकडय़ा नजरेनं कोण पाहील हो?  श्रीसद्गुरूंना खाऊपिऊ घालणं, त्यांना कपडालत्ता देणं, त्यांचे पाय चेपणं ही ‘सेवा’ आहे का? या सेवेचा ज्याला मोह आहे तो सद्गुरूच नव्हे आणि या सेवेतच गुंतलेला शिष्यही नव्हे! कारण तो या ‘सेवे’पलीकडे जातच नाही. खरी सेवा म्हणजे सेवन! पादसेवनम् म्हणतात ना? म्हणजे श्रीसद्गुरूंच्या पाऊलवाटेनं चालणं! ही खरी सेवा आहे.

-चैतन्य प्रेम