मनोबोधाच्या २८व्या श्लोकात आपण पाहिलं की, सद्गुरूंची काळावर सत्ता आहे, जो नित्यनेमात आहे त्याला हा नित्य अनुभव येईल. २९व्या श्लोकात आपण पाहिलं की काळावर सत्ता असूनही श्रीसद्गुरू काळाची मर्यादा राखून देहावतार संपवतात, मात्र आपल्या अनन्य भक्तांना नि:संग आणि भेदरहित अशा अंत:करणरूपी अयोध्येत स्थिर करतात. तर ३०व्या श्लोकात अनन्य होण्याची प्रक्रिया म्हणजे सेवा आणि सेवा म्हणजे त्यांच्या बोधानुरूप जगणं, हे आपण जाणलं. असा जो सेवक आहे त्याच्याकडे आंतरजगतातील सूक्ष्म विकार तरंगदेखील वाकडय़ा नजरेनं पाहू शकत नाही, हे समर्थ सांगतात. आता ३१व्या श्लोकात समस्त चराचर सद्गुरूंसमोर कसं नतमस्तक आहे आणि त्यांच्या परमाधारावर टिकून आहे, हे समर्थ सांगत आहेत. ३२व्या श्लोकात अचेतनवत झालेल्यांतही चेतना निर्माण करण्याचं त्यांचं सामथ्र्य सांगतात आणि ३३व्या श्लोकात चेतन-अचेतन अशा या सृष्टीतील सद्गुरूपरंपरेचं चिरंजीवत्व नमूद करतात! तर प्रथम ३१व्या श्लोकाकडे वळू. हा श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ असा आहे:

महासंकटीं सोडिलें देव जेणें।

Sandhya Devanathan
व्यवसाय वाढीमध्ये ‘एआयʼची महत्त्वाची भूमिका, मेटाच्या व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यांचे मत
Sita & Akbar: How names of two lions became the reason for a plea in Calcutta High Court
अकबराची बहीण लक्ष्मी? अकबर, सीता, तेंडुलकर आदी नावं प्राण्यांना द्यायची पद्धत कशी पडली?
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…
Acharya Pramod Krishnam
पंतप्रधान मोदींमुळेच देशात ‘हे’ तीन महत्त्वाचे निर्णय घेतले गेले; माजी काँग्रेस नेत्याचा दावा

प्रतापें बळें आगळा सर्वगूणें।

जयातें स्मरे शैलजा शूळपाणी।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी।। ३१।।

प्रचलित अर्थ : ज्यानं घोर संकटातून देवांना बंधमुक्त केलं, असा माझा राम हा प्रताप, बळ इत्यादि सर्व गुणांत आगळा आहे. पार्वती आणि शंकर ज्याचं निरंतर स्मरण करण्यात दंग असतात तो राम आपल्या दासाची कदापि उपेक्षा करीत नाही.

आता मननार्थाकडे वळू.. महासंकटी सोडिले देव जेणे! देव म्हणजे काय, याचा शोध अतिशय खोलवर घेता येईल आणि त्या शोधातून मनोबोधाच्या अनेक श्लोकांवर अधिक प्रकाश पडेल, हे खरं. पण इतक्या खोलात न जाता या श्लोकापुरता देव-विचार करू. माणसात देवकल्पना जन्मापासून रुजली असते. देव म्हणजे सर्वशक्तीमान आणि सर्वव्यापी, हा भाव असतो.  देवाची विविध रूपं माणसातल्या भाववैविध्यासाठी अनुरूप असतात आणि म्हणूनच माणसातील भक्तीभावाचा विकासही साधतात. देणारा तो देव, या कल्पनेतून जे काही हवं ते आपण देवाकडेच मागतो. संकटात त्याचीच करूणा भाकतो. विविध पुराणकथा जेव्हा वाचू लागतो तेव्हा अनेकानेक देवांमधील ‘मनुष्यत्व’ही ठसठशीतपणे नोंदलेलं दिसतं. देवांनाही अनेकदा अहंकार आणि मनोवेगांवर मात करता आली नाही, असं अनेक कथा उघडपणे सांगतात. पुण्यबळानं स्वर्ग लाभतो आणि पुण्यबळ संपलं की देवलोकातून मर्त्यलोकात परतावं लागतं, हा उल्लेख गीताही करते. याचाच अर्थ देवांचा राजा जो इंद्र त्याच्यापासून देवांचे अनेक अवतार हे माणसापेक्षा दिव्य आणि शक्तीमान आहेत. तरीही उत्पत्ती, स्थिती व लय प्रक्रियेचे संचालक ब्रह्मा-विष्णु-महेश, शक्ती आणि बुद्धीस्वरूप शारदा आणि गणेश, साकार व निराकारापलीकडे असलेला परमात्मा आणि या सर्वापलीकडे असूनही सर्वव्यापी असं सद्गुरूतत्त्व यांच्या जवळपासही हे अवतार पोहोचत नाहीत. उलट ते याच परमाधारावर टिकून राहातात. भगवान शंकरांनी सांगितलेल्या ‘गुरूगीते’तही याची पुष्टी आहे. आणि म्हणूनच या देवांवरही संकट ओढवतं तेव्हा त्यांना परमात्म्याकडे धाव घ्यावी लागते, हे अनेकानेक पुराणांत नमूद आहे. संकट याचाच अर्थ स्थिती वाईट होणं! त्यामुळे स्थितीची जबाबदारी ज्या तत्त्वाकडे आहे अशा विष्णुतत्त्वाला बळ देऊन त्याच्याच माध्यमातून सद्गुरूस्वरूप परमात्माच अवतरित होतो आणि यथार्थ तत्त्वाची पुनस्र्थापना करीत राहातो! रामकृष्णादि अवतार हे त्याचमुळे सद्गुरूतत्त्वाचंच अवतरण आहे.