News Flash

हास्यतरंग : शिक्षक आणि विद्यार्थी

वाचा मराठी विनोद

मुलगा : बाबा, टीचरनी उद्या शाळेत कुल्फी घेऊन यायला सांगितलंय…

बाबा : अरे पण कशी नेणार? शाळेत जाईपर्यंत ती वितळून जाईल. तुझ्या टीचर आपल्या घराजवळच राहतात; मी नेऊन देईन.

सकाळी टीचरच्या घरी…

बाबा : नमस्कार टीचर.
ही घ्या तुमच्यासाठी गारेगार कुल्फी आणलीये.

टीचर : कुल्फी? ती कशाबद्दल?

बाबा : तुम्ही शाळेत घेऊन यायला सांगितली असा मुलाने निरोप दिला मला;
पण तो लहान आहे, त्याला एवढं कळत नाही आणि रस्त्यात कुल्फी वितळली असती म्हणून मी स्वतःच घेऊन आलोय…

टीचर : मी त्याला कुल्फी नाही, स्कूल फी आणायला सांगितली होती…!!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2021 5:54 pm

Web Title: funny marathi joke teacher student and parents sdn 96
Next Stories
1 हास्यतरंग : हजरजबाबी बंड्या
2 हास्यतरंग : असा पाहुणचार नको
3 हास्यतरंग : आजोबा केसं कापयला जातात तेव्हा
Just Now!
X