News Flash

हास्यतरंग : एक मुलगी आपल्या बाबांबरोबर…

वाचा भन्नाट मराठी विनोद

एक मुलगी आपल्या बाबांबरोबर बाईकवर चालली होती. बाबांनी अचानक एका दुकानासमोर बाईक थांबवली आणि मुलीला तिथेच थांबायला सांगून, ते चॉकलेट आणायला गेले.

परत आल्यावर त्यांना बाईकजवळ मुलगी दिसली नाही म्हणून, त्यांनी इकडे-तिकडे नजर फिरवली तर त्यांना ती एका बिल्डिंगकडे जात असलेली दिसली.

त्यांनी तिला हाक मारल्यावर त्यांच्याकडे बघून ती म्हणाली, “बाबा, मी या बिल्डिंगला ओळखते. माझं या बिल्डिंगशी नक्कीच मागच्या जन्मीचं काहीतरी नातं आहे. कदाचित म्हणूनच मी तिच्याकडे अशी ओढली जातेय.”

ते ऐकून बाबांनी तिच्या पाठीत एक धपाटा दिला आणि म्हणाले, “ही मागच्या वर्षीपासून बंद असलेली तुझी शाळा आहे!”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2021 9:21 am

Web Title: latest funny marathi joke father and daughter marathi joke latest marathi joke dd 70
Next Stories
1 हास्यतरंग : आजाराच नेमकं कारण…
2 हास्यतरंग : हे लग्नाआधी मला…
3 हास्यतरंग : नवरा बायकोच भांडण होतं…
Just Now!
X