एक गृहस्थ खूप अजारी असल्याने त्याला एका प्रसिद्ध रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणले असता तो एकदम निरवानिरवीची भाषा सुरु केरतो –

मोठ्या मुलाला म्हणाले, “तू सर्वात मोठा…”

“आता जबाबदारी तुझ्यावर पडेल, म्हणून उद्यापासून सहवास सोसायटीतील १२ बंगले आणि गिरिजा शंकरमधील २६ फ्लॅट तुला.”

बायकोला म्हणाले, “रडू नकोस, माझ्या पश्चात तुला कोणासमोर हात पसरायला लागू नये, म्हणून डहाणूकर काॅलनीतील २ बिल्डिंग तुला.”

लहान मुलाला म्हणातो, “तू धाकटा…”

“जास्त जबाबदारी पेलणार की नाही समजत नाही, म्हणून कर्वेनगरमधील फक्त १७ फ्लॅट तुला.”

चला , आता मी शांतपणे ICU त जातो.

हॉस्पिटलमधील नर्स थक्क होऊन हे सर्व पहात होती. त्या गृगस्थाच्या बायकोला ती म्हणाली, “किती भाग्यवान आहात तुम्ही सारे, कुटुंबाकडे एवढी सारी प्रॉपर्टी सोपवून ते जात आहेत. भविष्यात काळजीच नाही हो ss…”

नर्सचे बोलणे ऐकून बायको म्हणाली, “तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो त्यांची पेपरची लाईन आहे. उद्यापासून वर्तमानपत्र वाटपाचे काम कोणी कसे करायचे हे त्यांनी सांगितले.”