आत्ता नेहमीच्या फळवाल्याकडे गेलो होतो. बाकी फळं घेतल्यावर तो म्हणाला, “काय साहेब, हापूस नाही घेतला अजून? अस्सल देवगड आहे बघा!”

मी आंबा हातात घेऊन वास घेतला आणि म्हणालो, “नेहमीच्या गिऱ्हाईकाला गंडवतोस होय? नाकाच्या इतक्या जवळ घेतला तरी वास नाही आला… हापूस म्हणजे कसा घमघमाट हवा…!”

Bohada look poster
५२ आठवडे, ५२ सोंग अन् त्यांचं अस्तित्व, दाक्षिणात्य निर्माते करणार मराठी चित्रपट ‘बोहाडा’ची निर्मिती
Marathi Joke
हास्यतरंग : डिनर करत…
kiran mane reacted on rohit pawar ED inquiry
“ईडी, सीबीआय नाहीतर रंगाबिल्ला येऊद्या, पण…”, मराठी अभिनेत्याची रोहित पवारांबद्दल पोस्ट; म्हणाले, “आयुष्यात…”
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार

शांतपणे माझ्या हातातला आंबा घेत तो म्हणाला, “तुम्ही टेस्ट करून बघा”

मग मी तो आंबा कापून फोड टेस्ट करायला देईल म्हणून वाट बघत थांबलो… फोड द्यायची त्याची काही हालचाल दिसेना म्हणून दोन मिनिटांनी त्याला विचारलं, “अरे देतोस ना टेस्ट करायला?”

तर तो म्हणाला, “आंब्याची टेस्ट नाय हो, तिकडं सरकारी दवाखान्यात जाऊन टेस्ट करून या असं सांगायलोय, आंब्याचा वास येईना झालाय तुम्हाला!”