News Flash

हास्यतरंग : तब्येत कशी आहे…

वाचा भन्नाट मराठी विनोद

आजींनी हॉस्पिटलमध्ये फोन केला आणि म्हणाल्या, “मला रूम नंबर ३०२ मधल्या निर्मला नेने यांची तब्येत कशी आहे ते कळू शकेल का? जरा काळजी वाटतेय, म्हणून फोन केला.”

“जरा दोन मिनिटं होल्ड करा हं.” असं म्हणत तिथल्या ऑपरेटरनं तिसऱ्या मजल्यावरच्या नर्सशी फोन जोडून दिला.

नर्स म्हणाली, “बऱ्या आहेत त्या आता. बीपी पण नॉर्मल झालंय आणि सगळ्या टेस्ट्स पण नॉर्मल आल्यात. डॉक्टर म्हणतायत उद्या सोडतील घरी त्यांना.”

“वा वा! खूप बरं वाटलं ऐकून ! धन्यवाद!” आजी म्हणाल्या.

नर्सनं विचारलं, “तुम्ही त्यांची बहीण बोलताय का?”

“नाही, मी स्वतः निर्मला नेने बोलतेय ३०२ मधून मला कोणीच काही धड सांगेना, म्हणून म्हणलं स्वतःच चौकशी करावी.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 3:53 pm

Web Title: latest funny marathi joke hospital nurse patient marathi joke latest marathi joke dd 70
Next Stories
1 हास्यतरंग : घरात बसून…
2 हास्यतरंग : तू कोणता…
3 हास्यतरंग : डॉक्टर आणि पुढारी
Just Now!
X