मास्तरांची बायको : तुम्हाला, हेमाचा फोन येतो आणि तुम्ही लगेच आवरून निघून जाता.

खरं खरं सागा ही हेमा कोण?

आणि केव्हाही का फोन करते?

म्हणजे, रात्र नाही दिवस नाही. सण-वार नाही…

कधी ही फोन करते आणि तुम्ही गडबडीत निघून जाता.

खरं सांगा, नाही तर मी आज जीव देईन.

मास्तर : अगं हळू बोल वेडे, ‘हेमा’ म्हणजे ‘हेड मास्तर’!