एका रिक्षावाल्याला पोलीस अडवतो.

पोलीस : रिक्षा गॅसवर आहे?

रिक्षावाला : नाही.

पोलीस : मग डिझेलवर आहे?

रिक्षावाला : नाही.

पोलीस : बरं पेट्रोलवर आहे?

रिक्षावाला : नाही.

पोलीस : अरे, मग कशावर आहे?

रिक्षावाला : हप्त्यावर.