स्थळ : अर्थातच पुणे

एक (अर्थातच पुणेरी) माणूस बरेच दिवस तब्येत खराब असूनही कधी ना कधी आपोआप बरा होईनच, उगाच डॉक्टरकडे जाऊन पैसे खर्च व्हायला नकोत अशा विचाराने घरीच थांबला.

शेवटी असह्य झाले तेव्हा त्याला डॉक्टरकडे जावेच लागले.

तेव्हा डॉक्टर (अर्थातच पुण्याचेच) स्पष्टपणे म्हणाले, “तुम्ही फार उशीर केलात, आता फक्त 12 तासांचे पाहुणे आहात. कदाचित उद्या सूर्योदय पण पाहू शकणार नाहीत.

त्याने घरी येऊन मोठ्या दुःखाने ही बातमी आपल्या पत्नीस सांगितली आणि ठरविले की शेवटची रात्र पत्नीसोबत प्रेमाने घालवावी.

दोघांनी बराच वेळ गप्पा मारल्या, भूतकाळातील बऱ्याच गोष्टींना उजाळा दिला.

बायको जांभया देतेय, डोळे मिटतेय असे बघून त्याने विचारले, “हे काय? आपली ही शेवटची रात्र आणि तुला झोप कशी येतेय??”

पत्नी (अर्थातच तीही पुण्याचीच) :

काय करु..???
तुमचं बरं आहे हो,
तुम्हाला काही उद्या सकाळी उठायचे नाहीये..!!

पण मला तर सकाळी लवकर उठावेच लागणार ना पुढच्या तयारीसाठी.!!!