काही पुणेरी व्याख्या- कार्यालय- घरगुती ताणतणावांपासून विश्रांती मिळवण्याची एक जागा. चौकशीची खिडकी- 'इथला माणूस कुठे गेला हो', अशी चौकशी शेजारच्या खिडकीत करावी लागणारी चौकोनी जागा. ग्रंथपाल- आपण मागू ते पुस्तक 'बाहेर गेले आहे', असे तिरकसपणे सांगण्यासाठी नेमलेला माणूस. विद्यार्थी- आपल्या शिक्षकांना काहीही ज्ञान नाही, अशी खात्री असलेला एक आत्मकेंद्री जीव.