‘साडय़ांचा रंग जाणार, नाही गेल्यास पैसे परत.’

दुकानावरील पाटी वाचून साडय़ा खरेदीसाठी झुंबड उडाली. पण वापरून पाहतात तो काय, पहिल्या धुलाईतच साडय़ांचा रंग गेला. संतापलेल्या महिला दुकानदाराकडे गेल्या आणि त्याला जाब विचारू लागल्या. दुकानदाराने शांतपणे डोके खाजवत त्या पाटीकडे बोट दाखवले. त्यावर लिहिले होते..

‘साडय़ांचा रंग जाणार, नाही गेल्यास पैसे परत.’

(तात्पर्य: विरामचिन्हे केवळ मोकळ्या जागा भरण्यासाठी नसतात!)