दोन मैत्रिणी एका उपाहारगृहात समोसा खायला गेल्या.

एक मैत्रीण केवळ समोशातील आतील भाजीच खात होती.

दुसऱ्या मैत्रिणीने विचारले, ‘अगं, तू समोशातील केवळ भाजीच का खात आहे. वरचं आवरण का काढून टाकते.’

पहिली मैत्रीण म्हणाली, ‘अगं, माझी आई म्हणाली, बाहेरचं काही खाऊ नको.’