चंप्या एकदा स्कूल बस ड्रायवरच्या मागे बसून बडबडत असतो.

जर माझी आई हत्तीण आणि बाबा हत्ती असते, तर मी छोटा हत्ती असतो.

जर माझी आई वाघीण आणि बाबा वाघ असते, तर मी छोटा वाघ असतो.

जर माझे आई-वडील जिराफ असते, तर मी पण छोटा जिराफ असतो.

ड्रायवर हे सगळं ऐकून वैतागून विचारतो, “जर तुझी आई वेडी आणि बाबा वेडे असते, तर तू काय झाला असतास?”

चंप्या म्हणतो, “मग मी स्कूल बस ड्रायवर झालो असतो.”