शिक्षक : मुलांनो चला वह्या काढा. पेन हाती घ्या आणि ‘मी अब्जाधिश झालो तर’ या विषयावर निबंध लिहा.

सर्व मुले शांतपणे लिहायला लागतात, पण मन्या तसाच बसला असतो.

शिक्षक : काय झाले मन्या तुला ? असा का बसला आहेस? चल लिहायला सुरुवात कर.

मन्या: नाही सर, मी माझ्या सहाय्यकाची वाट बघतो आहे.