वडील, आई आणि मन्या…
वडील : तुला माहीत आहे का? पैसे कमवायला किती मेहनत करावी लागते?
दिवसभर नुसता उंडारत असतोस.
आई : काय झालं? का ओरडत आहात?
वडील : अगं! पाच हजार रुपये उडवून आला आहे,
मत्रांबरोबर पार्टी केली.
आई : पाच हजार रुपये उडवले, तर काय झालं?
तुमचे पैसे त्याच्या आनंदापेक्षा जास्त आहेत का?
वडील : अगं! तुझ्याच पर्समधून पैसे उडवले आहेत.
हे ऐकून आई मन्याच्या एक ठेऊन देते!
