बॉस: अरे, कधीपासून हे काम करतोयस?

मन्या: पाच वर्षं झाली, सर! आधी मला पायलट व्हायचं होतं.

नंतर मी हे काम करायला सुरुवात केली.

मग…

हळूहळू या कामात माझा इंटरेस्ट वाढला.

आता तर मी खूप मन लावून हे काम करतो.

तुम्ही बघताय ना…!

बॉस: अरे, ‘कधीपासून’ म्हणजे नोकरी नाही रे!

दोन दिवस झाले, तू हेच एक काम करत बसला आहेस.

तुझ्याच्यानं होत नसेल तर सांग.

हे काम मी दुसऱ्या कोणाला देतो.

मला हे क्लायंटला प्रेझेंट करायचं आहे!