मन्या काकूंच्या घराची बेल वाजवतो.

काकू: काय रे मन्या?

मन्या: काकू, आज दुपारी दोन वाजता आमच्या घरी छोटंसं फंक्शन ठेवलं आहे. तुम्ही सगळ्यांनी नक्की यायचं हं!

काकू: अरे वा! कशाचं फंक्शन आहे?

मन्या: त्यात समोसे, कचोरी, गुलाबजाम, कोल्ड्रिंक, पिझ्झा, बर्गर…

(हे ऐकताच काकूंच्या तोंडाला पाणी सुटतं.)

मन्या: …या सगळ्या पदार्थांमुळे होणाऱ्या धोक्यांविषयी माहिती दिली जाणार आहे!

मन्या: त्यामुळे सगळ्यांनी नक्की या हं!

(हे ऐकून काकूंचा पार हिरमोड होतो.)