मन्या: जन्या, तुम्हाला किती मुलं आहेत?

जन्या: मला पाच मुलं आहेत.

मन्या: काय करतात ती?

जन्या: पहिल्या मुलाने एमबीए केलंय, दुसऱ्याने एमसीए, तिसऱ्याने बीए, चौथ्याने बीटेक आणि पाचवा चोर आहे.

मन्या: मग त्या चोर मुलाला घरातून बाहेर का काढत नाही?

जन्या: कसं काढू साहेब? घर तर त्याच्याच पैशांवर चाललंय. बाकी चारही जण बेरोजगार आहेत!