मन्या: सर, हे मी काय ऐकतोय? तुम्ही मला नाईट शिफ्ट लावलीत? मी नाईट शिफ्ट करू शकणार नाही.

मॅनेजर: का रे? काय झालं?

मन्या: सर, तुम्हाला तर माहीतच आहे, एवढ्या कमी पगारात माझं भागत नाही.

मॅनेजर: मग?

मन्या: त्यामुळे रात्री मी रिक्षा चालवतो.

मॅनेजर: अरे वेड्या, तू तर रडवलंस मला!

मन्या: का सर?

मॅनेजर: आता रिक्षा चालवताना रात्री कधी भूक लागली, तर टिळक चौकात ये. तिथे मी रात्री वडापावची गाडी लावतो!