जन्या: काय मन्या, कसा आहेस?

मन्या: मस्त! तू कसा आहेस?

जन्या: चाललंय.

मन्या: चल, तुला एक मजेशीर गोष्ट सांगतो.

जन्या: बरं, सांग.

मन्या: तुला जीवनचक्र काय असतं, हे माहीत आहे का?

जन्या: नाही रे, काय असतं?

मन्या: नीट ऐक. माणूस फळं खाणं सोडून समोसे आणि वडा-पाव खायला लागतो.

जन्या: मग?

मन्या: मग आजारी पडतो आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो.

जन्या: हं…

मन्या: हॉस्पिटलमध्ये नातेवाईक फळं घेऊन येतात, मग तो ती फळं खातो.

आणि…

नातेवाईक हॉस्पिटलच्या बाहेर बसून समोसे आणि वडा-पाव खातात!

हेच जीवनचक्र आहे!