कर्मचारी: सर, मी नोकरीचा राजीनामा देत आहे.
बॉस: काय? डोकं फिरलंय का तुझं? एवढी चांगली नोकरी सोडतोयस?
कर्मचारी: नाही सर, मी खरंच राजीनामा देतोय.
बॉस: अरे, इथे तुला २० टक्के पगारवाढ मिळणार होती!
कर्मचारी: सर, तिथे मला दुप्पट पगार मिळणार आहे.
बॉस: पण पगार म्हणजे सगळं काही नसतं! इथे फक्त ९ तासांची शिफ्ट आहे.
कर्मचारी: तिथे फक्त ८ तासांची शिफ्ट आहे.
बॉस: इथे किमान रविवारी तरी सुट्टी मिळते!
कर्मचारी: तिथे शनिवार आणि रविवार दोन्ही दिवस सुट्टी आहे.
बॉस: अरे, इथे दोन वर्षांत मॅनेजर होशील तू!
कर्मचारी: सर, तिथे तर मी पहिल्या दिवसापासूनच मॅनेजर आहे.
बॉस: पण आपलं ऑफिस तुझ्या घरापासून जवळ आहे!
कर्मचारी: सर, तिथे वर्क फ्रॉम होम आहे.
बॉस (कागद देत): बरं…! हे घे!
कर्मचारी: हे काय आहे, सर? माझं रिलिझिंग लेटर का?
बॉस: नाही…! नाही…! माझा सीव्ही आहे!
