बायको: अहो, ऐका ना! दूध संपलं आहे. दुकानात जाऊन दूध घेऊन या.
नवरा: दिसत नाही का? मी घरातलं काम करतोय.
बायको: पण दूध तर आणायलाच लागणार आहे ना!
नवरा: तुला किती वेळा सांगितलंय, स्कूटी चालवायला शिक. म्हणजे तू स्वतःही ही कामं करू शकशील.
बायको: माझी कामं जर फक्त जीभ चालवून होत असतील, तर स्कूटी कशाला चालवू?
