जन्या: काय मित्रा, काय म्हणतोस?

मन्या: मस्त, मजेत!

जन्या: मग आणखी काय?

मन्या: ऐक मित्रा, तुला एक मोलाचा सल्ला देतो…

जन्या: सांग ना.

मन्या: आयुष्यात टेन्शन घ्यायचंच नाही. तू मला रील पाठव, मी तुला रील पाठवतो. बघता बघता आपलं आयुष्य निघून जाईल.

टेन्शन घेऊन काय होणार आहे? उगाच डोक्याला ताण द्यायचा आणि शेवटी हॉस्पिटलमध्ये जायची वेळ आणायची. त्यात हॉस्पिटलचा खर्च वेगळाच! त्यापेक्षा टेन्शनच घेऊ नकोस.

करिअर वगैरेच्या मागेही फार लागू नकोस. त्यात काय फायदा आहे?

शेवटी तुलाही एक दिवस हे जग सोडून जायचं आहे आणि मलाही… मग उगाच कशाला टेन्शन घ्यायचं?

मन्याचं हे तत्त्वज्ञान ऐकून जन्या चक्रावून जातो…