या आठवड्याच्या शेवटी इतकं काही घडलं, की नैना पेचात पडली होती. सोमवार उजाडला आठवडा सुरू झाला, वीकेंड संपला आणि नैना ऑफिसमध्ये रुजू झाली. आज ऑफिसमध्ये कामाचा ताण नव्हता. कारण, हेड ऑफिसमधून काही सिनियर मंडळी आली होती. त्यांच्यासमोर प्रत्येकजण असं काही वागत होता जणू काही रोज ऑफिसमध्ये यांचा एकमेकांवर पूर्ण विश्वास असतो. नमित आणि नैना तर एकमेकांशी फार चांगले वागत होते. जे पाहून ऑफिस बॉयही थक्क झाला होता. अर्थात ते दिखाव्यासाठी होतं. पण, तरीही. त्याच रात्री ऑफिसमध्ये लॉनवर एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. इच्छा नसतानाही प्रत्येकजण पार्टीमध्ये गेला होता. स्मार्ट दिवसांच्या या पार्टीमध्ये स्टॅण्ड अप कॉमेडियनपासून, सिझलर्स आणि ‘इतर’ सर्व पदार्थांचीही सोय होती. पार्टीत येण्यासाठी नाकं मुरडणाऱ्यांनीसुद्धा ती एन्जॉय केली.

नमितही त्या ठिकाणी चांगलाच रुळला होता. पण, त्याची नजर सारखी सारखी रेहावर जात होती. पार्टीमध्ये ती सर्वात सुंदर दिसत होती. तर, नैना घोष इथे आयटी डिपार्टमेंटच्या मंडळींमध्ये बसली होती. पार्टीत असूनही ती एकटीच होती. शेवटी तिने निघण्याचा निर्णय घेतला. सर्वांना बाय करून ती निघाली. तिच्या मागोमाग नमितही गेला. हे कोणी नाही पण रेहाने पाहिलं. नमित त्याच्या वाटेने निघाला पार्किंग एरियामध्ये जाऊन त्याने कारची किल्ली घेत तो कारचं दार उघडणार इतक्यातच नैना तिथे आली.
“कोई प्रॉब्लेम ना हो तो, मै आपको छोड दू, इट्स टू लेट”
“नो थॅंक्स. आदत है मुझे.”

Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
Loksatta chavdi happening in Maharashtra politics news on Maharashtra political crisis
चावडी: नाना अन् तात्याचे पारावर उपोषण!
Gudi Padwa 2024
गुढीपाडव्यापासून ‘या’ ३ राशी होतील श्रीमंत? नववर्षात शनिदेवाच्या कृपेने उत्पन्नात होऊ शकते प्रचंड वाढ
pune kothrud area fire broke out godown pandal material
कोथरुडमध्ये मंडप साहित्याच्या गोदामाला आग

महिनाभरापूर्वीच ऑफिसमध्ये आलेल्या नमितला तिने उडवून लावलं. तिला तर त्याचं आडनावही ठाऊक नव्हतं. कोण कुठला माजोरडा मुलगा अशीच तिच्यालेखी त्याची प्रतिमा होती. त्यामुळे त्याला जास्त काही उत्तरं न देताच ती मोबाईलमध्ये ‘उबर’ बुक करण्यात बिझी झाली.
नमित तिथेच होता. शेवटी तो म्हणाला,”हट्टीपणा आणि उद्धटपणा अगदी जसाच्या तसाच आहे.”
तिने त्याच्ं हे पुटपुटणं ऐकलं होतं.
“ओ हॅल्लो… अपने काम से काम रखो और निकलो.”

नैना रागारागातच म्हणाली. नैनाच्या मोबाईलला सिग्नल मिळत नव्हता. पार्किंग एरियामध्ये येणारा हा नेहमीचा प्रॉब्लेम.

“फ… मॅन…”, म्हणत सवयीप्रामाणे पाय आपटत ती चालू लागली आणि ऑफिस बिल्डिंगच्या मेन गेटवर आली. नमितची कार अजूनही मेन गेटवरच होती. पण नैना काही त्यात बसली नाही. तिने ऑटो थांबवली आणि त्यात बसून निघून गेली. नमितला तिचं हे वागणं पटलं नाही. रात्रीचे जवळजवळ २ वाजले होते. त्याने नैनाच्या ऑटोचा तिच्या घरापर्यंत पाठलाग करण्याचं ठरवलं. सरतेशेवटी तिचं घर आलं. ती उतरली आणि अचानक तिच्या लक्षात आलं की, हा नमित आपल्या मागे मागे इथवर आला आहे.
“तेरी हिंम्मत कैसे हुई यहाँ तक आनेकी. धीस इज नॉट अवर ऑफिस यू बा….”
“ओके नाउ गो अपस्टेअर्स…”

त्याचं हे वागणं नैनाला अजिबात पटत नव्हतं. तिने नमितला चपराक मारली आणि पुन्हा आपल्या वाटेत न येण्याची ताकीद दिली. नमित शांत राहिला. नैना ताडताड निघून जात होती. एव्हाना तर ती घराच्या दारापर्यंत पोहोचली असावी इतक्यातच तिचा फोन वाजला. हा तोच नंबर होता जो काल रात्री आला होता.
“हॅलो नैन….”
“देखो आप जो कोई हो…. मेरे रास्ते आनेकी जुर्रत मत करना. ये हम आखरी बार बता रहे है.”
“हम तो आपके घरतक आ गये है”, असं तो म्हणाला आणि नैना फार घाबरली. कोणीतरी आपल्याला फसवतंय असंच तिला वाटत होतं. ती

धावत- धावत पुन्हा इमारतीच्या गेटपाशी आली. कारण आता तिला नमितची गरज होती. ती पार घाबरली होती. काय करावं काही सुचेनासं झालं होतं. तितक्याच पुन्हा फोन आला.. पण, आता मात्र त्या फोनच्या रिंगसोबत नमितही तिच्यासमोर येऊन उभा राहिला होता.
“नैना आप उपर नही गये?”

त्याने विचारलं आणि तिला वर सोडण्याचा निर्णय घेतला. नैनानं घराचं दार उघडलं. नमितलाही आत येण्याची विनंती केली. पण, इतक्या रात्री त्याने बाहेरुनच तिचा निरोप घेतला. आपण काहीतरी चूक केली, असं समजत खजिल झालेल्या नैनाने सॉरी आणि थँक्यू म्हणत त्याचे आभार मानले. तिने दार लावलं आणि पुन्हा फोन वाजला.
नैनाने फोन कट केला आणि ती नमितला गाठण्यासाठी जिन्याने खाली उतरु लागली. भितीमुळे ती घामाघूम झाली होती.
“नमित वेट…” असं म्हणून तिने त्याला सर्व प्रकार सांगितला. तो हसला आणि तिच्याकडे पाहून म्हणाला, ‘ही कोणती नैना… घाबरी-घुबरी.’
त्याने तिची समजूत काढून पुन्हा तिला वर पाठवलं. कशीबशी ती घराकडे वळली आणि पुन्हा फोन… पण, यावेळी फोन कट झाला होता. आणि तोच शेर… जो पहिल्यांदा ‘सराहा’वर आला होता. तोच शेर नमित म्हणत होता.
नैना दोन मिनिटं बधीर झाली. तिचा विश्वासच बसेना की तो नमितच होता. नमित हसत हसत नैनापाशी आला. भीतीमुळे तिच्या डोळ्यातून घळाघला पाणी वाहत होतं.

“नैना…. लिसन टू मी, तुला घाबरवायचं नव्हतं मला. मी सहज मेसेज केला. म्हटलं तू ओळखशील ‘नैन’ म्हटलं की. आपण, एकाच शाळेत होतो. सिनियर होतो मी तुला आणि तुला ‘नैन’ म्हणतात हे त्यामुळेच मला ठाऊक होतं.”
“नमित एसे कोई पेहचान बताता है क्या?”
ती रागवली होती. शेवटी तो म्हणाला,
“नैना माझी पद्धत चुकीची होती पण, तो शेर मनापासून केला होता. कारण इच्छा असूनही कधी मी तुझ्यापर्यंत पोहोचू शकलो नव्हतो. आणि आता संधी मिळाली तर ऑफिसमध्ये आपले खटकेच उडायला लागले होते. बट ट्रस्ट मी नैना…. मला तुझ्यासोबत हे नातं पुढे न्यायला आवडेल. एक संधी देशील का?” तिच्याकडे काहीच उत्तर नव्हतं. पण, निरुत्तरित नैनाचे ‘नैन’ मात्र बरंच काही सांगून गेले होते. आता ते काय होतं, हे नमितलाच ठाऊक…

(उत्तरार्ध)
– तीन फुल्या, तीन बदाम