सागरला पॅरालॅसिसचा अटॅक आल्याचं ऐकताच क्षितीजाला मोठा धक्का बसला होता.. माक्ष तिनं स्वत:ला सावरलं.. कारण सागरच्या आईला धीर देणं जास्त महत्त्वाचं होतं..

“आई, तुम्ही शांत व्हा.. काळजी करु नका.. मी लगेच पोहोचते..” क्षितीजाच्या पायाखालची जमीन सरकली होती.. मात्र तरीही ती सागरच्या आईला धीर देत होती.. लग्नाला फक्त सहा महिने झाले असताना, सागर अद्याप नीट बोलतही नसताना असं काही घडावं.. क्षितीजा सुन्न झाली होती.. तिनं हॉस्पिटल गाठलं.. आई-बाबांना धीर दिला.. क्षितीजा मनातून कोलमडून पडली होती.. मात्र तरीही ती दाखवत नव्हती.. कारण आता संपूर्ण घराची जबाबदारी तिच्यावर होती..

Netanyahu
अग्रलेख: मिरवण्याच्या मर्यादा!
gadchiroli lok sabha marathi news, gadchiroli lok sabha election marathi news
७ हेलिकॉप्टर, १५ हजारांहून अधिक जवान, गडचिरोलीत युद्ध क्षेत्राचा भास व्हावा…..
Loksatta Lokrang Picture Painting Tourist places the sea
चित्रास कारण की: समुद्रसरडा
Police-Naxalite encounter on Chhattisgarh border plans of the Naxals to cause an accident were foiled
छत्तीसगड सीमेवर पोलीस-नक्षल चकमक, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपात…

सागरला हॉस्पिटलमधून घरी आणण्यात आलं.. मात्र तरीही तो पूर्ण बरा झाला नव्हता.. स्वत:ची अनेक कामं करणं त्याला जमत नव्हतं. क्षितीजानं काही दिवस सुट्टी घेतली.. सागरचं औषध पाणी, त्याला योग्य वेळी जेवण, त्याला उठायला-चालायला मदत असं सारं काही क्षितीजाच करायची.. सागरच्या आई बाबांवर तिनं कसलाही भार पडू दिला नाही.. थोड्या दिवसांनी ऑफिसला जाऊ लागल्यावरही क्षितीजाच घरचं सर्व करुन जायची.. घरातली सारी कामं करुन ती ऑफिसला जायची.. सागरला एकटं वाटू नये, म्हणून अनेकदा फोन करायची.. औषधं घेण्याची आठवण करायची.. रात्री जेवणदेखील भरवायची..

“ऐक ना क्षितीजा..” एके दिवशी सकाळी सागरने हाक मारली..

“हा बोला ना.. काही हवंय का..?” क्षितीजनं विचारलं..

“माझ्या हाताची आता बऱ्यापैकी हालचाल होतेय.. चालायलादेखील होतंय.. मी घरातूनच थोडं काम करु का..? मला खूप कंटाळा येतो दिवसभर.. आणि तुझ्या एकटीवर सर्व भार आहे..” सागर मनापासून म्हणत होता..

“काही भार वगैरे नाहीय.. आणि तुम्ही आराम करा.. व्यवस्थित बरे व्हा आणि मग काम करा..” क्षितीजानं अतिशय समजूतदारपणे उत्तर दिलं..
सकाळी लवकर उठायचं, घरातलं सारं काम आटपायचं. जेवण बनवायचं, घर आवरायचं, मग बस-लोकलच्या गर्दीतून प्रवास करायचा, दिवसभर ऑफिसमध्ये काम, संध्याकाळी पुन्हा प्रवास, रात्री सर्व आवरुन झोपायला उशीर हा जणू क्षितीजाचा दिनक्रम झाला होता.. सागरची आई शक्यतेवढी मदत करायची.. मात्र त्यानाही वयामुळे तेवढं काम झेपायचं नाही.. मात्र याची कसलीही तक्रार एका शब्दानंही क्षितीजानं कधी केली नाही..

Love Diaries : सागराहुनी उत्तुंग क्षितिजा

क्षितीजाच्या मदतीमुळं सागर हळूहळू पॅरालिसीसमधून सावरला.. व्यवस्थित चालायला लागला.. एके दिवशी सागर घरात चालत असताना रात्री घराची बेल वाजली.. सागरनेच दरवाजा उघडला.. समोर ऑफिसवरुन परतलेली क्षितीजा होती.. सागरला चालताना पाहताना क्षितीजाच्या चेहऱ्यावर आनंद होता.. जी मुलगी तिचं घरदार सोडून आपल्याकडे आली, ज्या मुलीसोबत आपण सहा महिने नीट बोललोदेखील नाही, तिनं आपल्यासाठी गेली कित्येक महिने किती आणि काय काय केलं होतं, हे आठवून सागरच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळले होते.. सागरनं क्षितीजाला घट्ट मिठी मारली.. इतके महिने क्षितीजासोबत दोन शब्ददेखील नीट न बोललेल्या सागरला त्या दिवशी शब्दांचीही गरज वाटली नाही.. सागरच्या घट्ट मिठीने, त्याच्या अश्रूंनी क्षितीजाला शब्दांपलीकडचं सारंकाही सांगितलं होतं..
…………………………….
दरवाज्याची बेल वाजली.. भूतकाळात गेलेला सागर वर्तमानकाळात आला.. त्यानं जाऊन दरवाजा उघडला.. समोर क्षितीजा उभी होती.. सागरनं तिच्या हातातल्या पिशव्या घेतल्या.. सागर क्षितीजाला बेडरुममध्ये घेऊन आला..

“क्षितीजा, तू मला सागर म्हटलंस तरी चालेल.. आज आपल्या लग्नाचा दुसरा वाढदिवस.. त्या निमित्तानं आज तू सागर म्हणायला सुरुवात कर.. पहिला वाढदिवस माझ्या आजारपणामुळं साजरा करता आला नाही..” सागर मनापासून म्हणत होता.. त्याच्या आवाजातून क्षितीजाला ते जाणवत होतं..

“अहो.. ठिक आहे ना..”, क्षितीजा काही बोलणार इतक्यात सागरनं तिला थांबवलं..

“अहो नाही.. सागर.. सागर म्हणायचं..” सागर प्रेमानं म्हणाला..

“दोन वर्षांत सवय झाली.. सवय मोडणं थोडं अवघड आहे.. पण प्रयत्न करेन..” क्षितीजा प्रसन्नपणे हसली..

“चालेल.. काही हरकत नाही.. आणि हो.. तुझ्यासाठी मी एक पत्र लिहिलंय.. वाचून दाखवतो..” सागर म्हणाला.. क्षितीजा प्रेमानं सागरकडं पाहात होती..

“प्रिय क्षितीजा… सॉरी सॉरी.. प्रिय पत्नी.. माय बेटरहाफ क्षितीजा.. माझ्या आईनं मला जन्म दिला.. मात्र तू मला वर्षभरापूर्वी पुनर्जन्म दिलास.. आज मी जो काही आहे आणि फक्त तुझ्यामुळं.. लग्नानंतर मी तुझ्याशी दोन गोड शब्द बोललो नाही.. तू मात्र रात्र-रात्र माझ्या बाजूला जागून होतीस.. मी तुला वारंवार टाळलं.. तू मात्र कधीही मला दूर केलं नाहीस.. माझ्या आजारपणात तुझी काहीही चूक नव्हती.. माझ्यामुळं तुला खूप सहन करावं लागलं.. खूप त्रास झाला.. खूप दगदग झाली.. मात्र त्याबद्दल तू कधी एका शब्दानं तक्रार केली नाहीस.. मी लवकर बरं व्हावं, म्हणून कायम काळजी करायचीस.. इतका चांगूलपणा तू कुठून आणलास..? असा प्रश्न पडतो.. तू जे काही केलंस, त्याला मी उपकार म्हणेन.. मात्र तसं म्हटलेलं तुला आवडणार नाही, हे माहितीये मला..”

सागर पत्र वाचत होता.. क्षितीजाच्या डोळ्यातून अश्रू वाहात होते.. सागरने तिला जवळ घेतलं.. आणि पुढं वाचू लागला.

“आतापर्यंत मी तुझ्याशी खूप वाईट वागलो.. मात्र तू नेहमी माझ्यासोबत फक्त आणि फक्त प्रेमानं वागलीस.. मला तुझं खूप कौतुक वाटतं.. आणि स्वत:चा तितकाच रागदेखील येतो.. त्यामुळं यापुढे मी तुझ्याशी प्रेमानेच वागेन.. तुझ्या इतकं प्रेमाने राहणं मला जमेल की नाही, माहिती नाही.. मात्र प्रयत्न नक्की करेन.. सागर आणि क्षितीज ज्याप्रकारे कायम सोबत असतात, त्याचप्रकारे कायम सोबत राहू..” सागरचं पत्र वाचून झालं होतं.. क्षितीजाच्या डोळ्यात अश्रू होते.. सागरची अवस्थादेखील काही वेगळी नव्हती.. सागर आणि क्षितीजाच्या एका नव्या आयुष्याला सुरुवात झाली होती.. जगासाठी दोघांचं लग्न दोन वर्षांपूर्वी झालं असलं, तरी मनोमिलन आज झालं होतं.. त्या दिवसापासून क्षितीजा आणि सागर कायमचे एकमेकांचे झाले..
(उत्तरार्ध)

– तीन फुल्या, तीन बदाम
 

© सर्व हक्क सुरक्षित