सुट्टी संपली अजून ती कॉलेजला आली नव्हती. सुरुवातीला होत असलेला त्रास आता कमी झाला होता. अशात एके दिवशी ती कॉलेजमध्ये दिसली. दूरून तिला पाहिल्यानंतर धडधड सुरु झाली. त्या दिवशी ती बोलली नाही. मात्र दुसऱ्या दिवशी ती स्वतःला रोखू शकली नाही. का बोलणं बंद केलं हे तिनं सांगितलं नाही. त्यानंही विचारण्याची घाई केली नाही. काही दिवस गेल्यानंतर बोलत नव्हतो. हे ही विसरून गेलो… पुन्हा पहिल्यासारख रुटीन सुरु झालं. केदारही कॉलेज सोडून गेला होता. त्यामुळे आता अक्षयच आरतीचा जवळचा मित्र होता. दोघांनी मिळून फिरणं, कँटीन, मस्ती सुरु होती. बऱ्याच दिवसानंतर त्यांनी पिक्चरला जायचं ठरवलं. तिकीट काउंटरवर गेल्यावर त्यानं ‘दो कॉर्नर सीट’ असं सांगितलं. त्यावेळी तिनं कटाक्ष टाकला. हे तिला आवडलं नसल्याचं त्याच्या लक्षात आलं. खिशात हात घालत पैसे कमी असल्याचं दाखवून त्यानं चूक सुधारली. सेंटर रो मध्ये बसून त्यांनी पिक्चर पाहिला. त्यानंतर दररोजचं भेटणं सुरूच होतं. त्यामुळे दोघांबाबत उलट सुलट चर्चा सुरु झाली होती. पण डायरेक्ट बोलायची कोणी हिम्मत करत नव्हतं. अक्षयचे मित्र त्याला विचारत होते. पण तिला कोणी बोलत नव्हतं. कोणाचीही पर्वा न करत बिनधास्त ते भटकत होते. मग कधी पैसे नसतील तर तिच्या वॉलेटमधून पैसे घेतानाही त्याला संकोच वाटत नव्हता. अशात तिचा बर्थडे आला. दोघांची चर्चा खूप होती, म्हणून धीरजला पुढे करत त्यानं सेलिब्रेशन केलं. मात्र त्यावेळी भयंकर संताप आणणारी घटना घडली. अभिजितने दिलेलं लाल गुलाबाचं फुलं तीन घेतलं. अभिजित तसा तिचा ज्युनियर. अक्षयच्या जीवाचा तिळपापड झाला होता.

तो तिथून सटकला. तिच्या हे लक्षात आलं. रात्री फोन वर बोलत असताना तो फक्त मित्र असल्याचं तिनं सांगितलं. खरंतर अक्षयला हे सांगण्याची गरज नव्हती. मात्र तिनं सांगितलं होतं. खरंतर यामध्ये समजून घेण्याऐवजी तो तिला चिडवत बसला. त्याच वेळी केदार सोबतच्या भांडणाचा विषय निघाला. मात्र जास्त न लांबवता तिनं तो विषय तिथंच संपवला. दोन दिवस तणावात गेले. तिसऱ्या दिवशी त्यांच्यातला तणाव निवळला. त्यांनी मूव्हीला प्लॅन केला. यावेळी तो तिनं केला होता. त्यामुळे तिकीट तिनं काढलं ते ही दोन कॉर्नर सीट. मूव्ही सुरु झाला. तसे दोघं अगदी जवळ आले. त्यानं तिच्या खांद्यावर हात ठेवला. दोघांची नजरेला नजर झाली. काही वेळात ओठ एकमेकांवर होते. त्यांनी किस केला. त्या पहिल्या किस नंतर न बोलता ते खूप जवळ आले. मूव्ही त्यामध्ये किस हे प्रमाण वाढलं. त्यांच्यात भांडणही वाढली होती. मात्र ती मिटायची लगेच. ते मिठण्याचं एक ठिकाण होतं हॉटेल मैत्री. तिथल्या ठरलेल्या टेबलवर जायचं तिचा आवडता ‘मेंदू वडा’ खायचा. (त्यानं अपभ्रंश केलेला) तो खात खात भांडण मिटायची. अजूनही दोघांनी एकमेकांना प्रपोज केलेलं नव्हतं. अशात एका नोकरीसाठी तिचं कॅम्पस सिलेक्शन झालं. खूप आनंद आणि तेवढंच वाईट वाटलं. तू ही लवकर जॉब बघ, असं सांगतं तिनं निरोप घेतला.

loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: माणसांबाबत तरी संवेदनशील आहोत?
live in relationship old age marathi article
समुपदेशन : वृद्धत्वात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ?
tiger jumps 20 feet to cross river vide
वाघ की रॉकेट? वाघाच्या उडीची सोशल मीडियावर एकच चर्चा…सुंदरबनमधील VIDEO व्हायरल
how to control blood sugar on the occasion of holi
Blood Sugar : होळीला गोड खाताना रक्तातील साखर कशी नियंत्रणात ठेवावी? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…

मुंबई मायानगरीत ती गेली होती. आता फोनचा वापर वाढला होता. दिवसभर काय झालं ते ती फोनवर सांगायची. सुट्टीला ती कोल्हापूरला गेली. परत मुंबईला जाताना पुण्यात खास भेटली. भेटीत खूप धम्माल करायची हा प्लॅन त्यानं केलेला. पण ती जरा सिरीयस दिसली.
“आपण कुठं तरी शांत ठिकाणी बसू तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचंय”
तिच्या बोलण्यावरून अंदाज आला होता. थेट दोघेजण सारसबागेत गेलो. तिनं दिवाळीच्या अगोदरच्या अबोल्याचा विषय काढला.
“मी का बोलतं नव्हते नाही विचारलं”
“विचारलं होतं पण तू सांगितलं नाहीस”
“आता ऐकशील?”
“तुला सांगण्याची गरज वाटत असेल तर सांग”
“तासन तास आपण बोलतोय हे आमच्या घरी माहिती झालं.”
“मग”
“काय बोलता हे ताईनं विचारलं होतं”
“मित्र बोलतोय म्हणून सांगायचं होतं”
“सांगितलं होत पण विश्वास बसला नाही, मित्र मग रात्री का?, याचं उत्तर माझ्याकडे नव्हतं”
तो काही बोलण्याच्या अगोदरच ती बोलली.
“यापुढे तुझ्याशी बोलणार नाही, या अटीवर घरून कॉलेजला आले होते”
खरंतर त्यावेळी दोघे मित्रच होते. कॉलेजमधील गप्पा मित्र, मैत्रिणी यामध्ये त्यांच्यातल्या गप्पा हाच विषय असायचा. पण त्यावर विश्वास कोण ठेवणार.

“पण हे सार आत्ता का सांगतेस ?” अक्षयने विचारलं.
“कारण घरच्यांनी सांगून देखील मी तुला बोलतेय हे घरी माहिती झालं, त्यांनी मला तुझ्याशी बोलू नको नाहीतर घरी बसवू असं सांगितलंय. आईची परवानगी घेऊन तुझ्याशी शेवटचं बोलतेय. या पुढे मी तुझ्याशी बोलणार नाही”
तिने एवढं सांगितल्यानंतर अक्षयने प्रश्न विचारला.
“घरी कसं काय माहिती झालं?”
तिच्या पोस्टपेड बिलाच बिल घरी गेलं होतं. आणि त्याच्या नंबरवर झालेला कॉल त्यावर जास्त होता. म्हणून पहिल्या वेळेस आणि आता घरी माहिती झालं. हे ऐकल्यानंतर त्यानं एक उपाय काढला.
“आपल्याला बोलायला दुसरा नंबर घे”
“घरच्यांना समजणार नाही”
तीन त्या गोष्टीला नकार दिला.
“तुझा उपाय तुझ्या जवळ राहू दे”
असं म्हणत तिनं यापुढे बोलायचं नाही. मला विसरून जा. ती परत मुंबईला गेली. तिच्या कपाळाला किस करून तिला निरोप दिला. न बोलता पंधरा दिवस झाले असतील. दोघांचा निर्धार तुटला. दोघे पुन्हा बोलू लागले. आता नव्या नंबर वरून. तिला सुट्टी नसल्याने मग अक्षय भेटण्यासाठी मुंबईला गेला. पहिल्यांदा तो मुंबईला जात होता. तिनं लोकलमधून चढता उतरता त्याची काळजी घेतली. मरीन ड्रॉइव्ह, हॉटेल ताज, चर्चगेट आणि काही म्युझिअम पहिले. त्यात दिवस गेला. त्याच्या ओळखीचं कोणीच मुंबईत नव्हतं. म्हणून हॉटेलमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला. एक रूम दोघांनी शेअर केली. रात्री हॉटेलवर गेल्यावर जेवण झाली. खूप गप्पा मारल्या. लाइट बंद केली. त्यान हात तिच्या अंगावर टाकला. रात्र उजाडली. एका खोलीत रात्रभर दोघ सोबत असताना देखील त्यानी मर्यादा सोडल्या नव्हत्या. तिच्या ठामपणामुळे स्वातंत्र्य उपभोगत त्यांनी स्वैराचार केला नव्हता. तेव्हापासून त्याच्या नजरेत तिची वेगळीच प्रतिमा तयार झाली होती.

डबल सिम कार्डच प्रकरणही तिच्या घरी माहिती झालं होतं. घरून तिच्यावर प्रेशर होतं. अशात अभिजितच्या लाल गुलाब प्रकरणावरून त्यांच्यात भांडण झालं. ते कायमचं… पुन्हा ती बोलेल का नाही माहिती नव्हतं. कारण भांडणानंतर तो तिला त्याच्या बर्थडे दिवशी भेटायला गेला होता. पण ती भेटलीही नव्हती…. त्यानंतर पंधरा दिवसांत ती कोल्हापूरला निघून गेली. त्यानं खूप फोन केले. मात्र रिसिव्ह केला जात नव्हता. एक दोनदा केला केला तर
“तुझ्याशी बोलायचं नाही. मी आनंदी राहावं वाटतं असेल तर मला फोन करू नकोस.” असं तिनं सांगितलं. तो फोन करत होता. तब्बल दोन वर्षांचा काळ लोटला. ती घरी होती. त्याच्याशी तिचं बोलणं नव्हतं. काय झालं? अशी का वागतेय ? मला नाही बोलायचं तर नको बोलू किमान बाहेर तरी पडावं. असे अनेक विचार त्याच्या मनात होते. केदारशी ती बोलते असं कळालं. त्यानं केदारला फोन केला.
“हॅलो मी अक्षय बोलतोय”
समोरून आवाज आला
“बोल अक्षय”
आणि संवाद सुरु झाला. ती डिप्रेशनमध्ये असल्याचं त्याला कळालं. घराबाहेर पडायचं नको म्हणतेय. त्याचवेळी त्यानं ठरवलं काहीही झालं तरी चालेल. पण तिला बाहेर काढायचं. पण ती फोन उचलत नव्हती. आजारपणामुळे ती त्याच्यापासून दूर झाली. ती कशी आहे, तिला एकदा पाहावं. किमान आवाज तरी कानावर पडावा यासाठी तो दररोज फोन लावायचा. पण तिकडून
“आपने जिस व्यक्ती को कॉल किया है, वह अभी जबाब नहीं दे रहा”

असा आवाज कानावर पडायचा. कदाचित तो तिचा असेल तर? विचार मनात यायचा. तब्बल दोन वर्षे अशा परिस्थितीत गेली. त्याच्या जगण्यातला आनंद केव्हाच हरवला होता. तिच्या आजारपणाला तो स्वतःला दोष द्यायचा. मनातलं कोणाजवळ बोलताही येत नव्हते. मनात काही नसताना एके दिवशी तिचा मेल आला. तसा तो कामाचा मेल. पण जणू काही मेलमधून ती भेटतीये असा भास झाला. त्यानंतर संवाद सुरु झाला. तिच्या विरहात त्यालाही आजाराने जखडलं होतं. त्यावर तिच्या बोलण्याचे औषध कामी येत होतं. ती बोलत नसली तरी तिलाही तो संवाद हवाहवासा वाटत होता. तिनं झालेला सगळं प्रसंग सांगितला. अशा स्वरूपाचा आजार व्हायची ती तिची दुसरी वेळ होती. मात्र आता ती बोलायला लागली होती. तो आजारी त्याला आपण बोलण्याची गरज म्हणून ती बोलायची. आणि ती पुन्हा पहिल्यासारखी स्वच्छंदी व्हावी म्हणून तो प्रयत्नशील होता. तीन चार महिन्यानंतर त्याच्या प्रयत्नांना यश आलं. ती तब्बल दोन वर्षांनंतर घराबाहेर पडली. खूप दिवसानंतर ते भेटले.

आजारपणाने तिचं शरीर जीर्ण झालं होतं. ते पाहिल्यानंतर त्याला गलबलून आलं. पुन्हा पहिल्यासारख हिचं आयुष्य सुरळीत झालं पाहिजे, असा पक्का निर्धार त्यानं मनाशी केला. त्यानंतर दोघांचा संवाद वाढला. दोघांमध्ये कधी भांडण, कधी प्रेमाच्या गोष्टी चालू असायच्या. एक मात्र होतं. आता पहिल्यासारख तो भांडत नव्हता. ती म्हणेल त्यात तो राजी व्हायचा. ती गाव सोडून आता बाहेर आली. दोघे आतापर्यंत घरच्यांच्या विरोध असताना भेटायचे आता मात्र परवानगीने भेटायचे. मित्र म्हणून. होतीच ती त्याची मैत्रीण. तिला त्याच मन ओळखता यायचं. म्हणून तो तिच्या जवळ मन हलकं करायचा. तिच्यासोबत तासनतास गप्पा मारत बसलं तरी वेळ काही मिनिटांसारखा वाटायचा. कधी कधी वाटायचं हे शारीरिक आकर्षण आहे का? तर नक्कीच त्याच उत्तर नाही असायचं कारण त्या दोन वर्षाच्या काळाने ते सिद्ध करून दाखवलं होतं. त्यांच्यात तीच ओढ होती.

मित्र म्हणून ते वावरत होते. पण दोघाच्याही मनात प्रेमगीत सुरु होतं. तिला त्याची कायमची सोबत हवी होती. पण तो देण्यासाठी तयार नव्हता. त्याला ती आवडत नाही म्हणून नव्हे तर परस्थिती, जात, कुटुंब आडवं येत होतं. घरच्यांचा विरोध त्यामुळं तिला आश्वस्त करायचं कसं. कारण आपण पळून वगैरे लग्न करणार नाही. घरी घेऊन आलं तर घरचे स्वीकारणार नाही हे माहिती होतं. त्यांना राजी करायचं खूप अवघड काम होतं. त्यामध्ये आता कुठं आजारपणातून बाहेर आलेली ती, पुन्हा या सगळ्यांशी सामना करू शकेल का?, असा प्रश्न समोर होता. करायचा ठरवलं मात्र तो दोन वर्षांचा काळ डोळ्यासमोर उभा राहिला. हा सारा विचार करून त्यानं काळजावर दगड ठेऊन तिच्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. तिनं ही ते स्वीकारलं. पण ते सहज शक्य नव्हतं. मित्र म्हणून बोलत असताना नकळत त्याचा ‘लव्ह मोड’ ऑन व्हायचा. चॅट करत असताना त्यांचं सिंहगडला जायचं ठरलं. अभिजित, तू आणि मी असं ती बोलली. पण अक्षय नको बोलला. एक तर दोघे नाहीतर संपूर्ण ग्रुप. पण ते शक्य नव्हतं. रोशन, मानसी, सुशांत येतील का हे सांगता येत नव्हतं. केदार आणि अभिजित ती बोलल्यावर येतील असं अक्षय बोलला. प्लॅन ठरला तिने सगळ्यांशी बोलायचं.. ती ही तयार झाली…

मात्र त्याच दिवशी रात्री त्यांच्यात भांडण झालं. म्हणजे ती बोलली तो ऐकत होता.
“तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम सुरु आहेत.”
“मला कायमचा बाय कर”
तो बोलला
“निघून जाईन मी तुझ्या आयुष्यातून”
“असं अनेकदा बोललास, दिलेला शब्द पाळ, स्वतःशी तरी प्रामाणिक राहा,” ती म्हणाली.
अगोदर असं बोलणं अनेकदा झालेलं. पण आता त्यानं हे सकारात्मकपणे घेतलं होत. पण तिचे शब्द मनात आरपार गेले होते..
“आपण तिचा विचार करतो ती अशी कशी काय बोलू शकते”
“आपलं प्रेम काळाने थांबवलं होतं. ते संपण अशक्य ”
“माझ्या सोबत आली, तर पुन्हा ती आजारी पडेल, हा समाज तिला जगू देणार नाही”
“तिच्यासाठी तरी मी स्वार्थ बाजूला ठेवला पाहिजे”
“तिच्यावर असलेल्या प्रेमामुळे मी दूर जातोय, तिला कसं कळत नसेल”
“का कळतं म्हणून ती अशी बोलली?”
असे अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात येत होते.
“ती रागात असं बोलली असेल”

असं मनाला सांगत पुन्हा मेसेज करेल ही त्याला अपेक्षा होती. फोन सायलेंटवर होता. मात्र भोवताली असलेल्या सायलेन्समुळे, त्यावर होणाऱ्या मेसेजच्या व्हायब्रेशनने शांतता भंगत होती. रात्रीचे सव्वा बारा वाजले तरी तो फोन स्वीच ऑफ करत नव्हता. कधी छताकडे तर कधी फोनकडे नजर टाकायचा. कारण तिच्या मोबाईलमध्ये लास्ट सीन बाराचा असल्यामुळे मेसेज येईल या विश्वासानं प्रत्येक मेसेज आला की फोन उचलून घ्यायचा. पाहून परत जागच्या जागी ठेवायचा. डोक्यावर फिरत असलेला पंखा आणि डोक्यातील विचार गरगरत होते. उठून पंख्याच बटण बंद केलं. डोक्यालाही बटण असतं तर? विचार बंद करता आले असते. पण ते शक्य नव्हतं. असं कित्येक वेळा झालेलं. त्यामुळं आजचा प्रसंग नवा नव्हता. मात्र त्यातली शांतता नवी होती. कदाचित आज सोबतीला कोणीच नव्हतं म्हणून वाटत असावी. काहीही असो, पण काहीतरी वेगळं घडत होतं. पंखा बंद झाला तसा त्याच्या डोक्यात बंद पंख्याला लटकून सुसाईड करण्याचा विचार फिरत होता. पण मध्येच गुर्रर्र गुर्रर्र करणारे मेसेज लक्ष डायव्हर्ट करायचे. तसं बघायला गेलं तर ती त्याच्या जीवनात आलेली दुसरी मुलगी. पहिली त्याच्यावर प्रेम करायची आणि हा प्रेमाचा ट्रँगल तयार झाला होता. आज ‘मैत्री-प्रेम-मैत्री’ हा त्यांचा प्रवास थांबलेला होता. त्याच्या मनातला सुसाईडचा विचारही थांबला होता. तो थांबला नसता तर त्याचं प्रेम स्वार्थी ठरलं असतं. कारण या जगातून जाऊन आई, वडील आणि तिला वेदना द्यायच्या नव्हत्या. पुन्हा भेट होईल का? तिची जागा कोण घेईल का? या प्रश्नांची उत्तरं त्यानं काळावर सोडली होती. कारण तो सारं शिकवतो. एक गोष्ट मात्र त्याला बोचत होती. ‘लव्ह ट्रँगल’ मधल्या पहिल्या मुलीचं प्रेम समजून घेतलं नाही म्हणून आपल्यासमोर ही परिस्थिती आली. पण तुझ्याशिवाय मी जगू शकणार नाही असं म्हणणारी ‘ती’ पहिली मुलगी सुखात नांदत होती…
समाप्त
– तीन फुल्या, तीन बदाम