– सुनील धवन

आपल्यासाठी किंवा कुटुंबातील सदस्यांसाठी कोणत्याही प्रकारचं आरोग्य विमा योजना कवच न घेणाऱ्या अनेकांसाठी करोना महामारीने जागं केलं आहे. रुग्णालयात किती काळासाठी दाखल आहोत यावरुन आधारित रुग्णालयाचा खर्च लाखांच्या घरात असू शकतो. ज्यांच्याकडे आरोग्य विमा योजना होती त्यांच्यासाठी त्यांची विमा कंपनी रुग्णालयाचं बिल भरत होती. पण ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची विमा योजना नव्हती त्यांना मात्र आपल्याच खिशातून बिल भरावं लागलं. जर तुम्हाला वाढत जाणारं मेडिकल बिल भरण्यासाठी सेव्हिंगला हात लावायचा नसेल तर अजिबात विलंब न करता लवकरात लवकर पुरेसा आरोग्य कवच खरेदी करा.

करोना व्हायरस आरोग्य योजनेबद्दल
कोविड इतक्या लवकर आपल्यातून जाणार नसल्याने विमा नियामक आयआरडीएआयने २०२० मध्ये विमा कंपन्यांना एक्स्लुझिव्ह करोना व्हायरस आरोग्य विमा योजना ऑफर करण्यास सांगितलं होतं. करोना व्हायरल आरोग्य विमा योजनेचे करोना कवच योजना आणि करोना रक्षक योजना असे दोन प्रकार मार्केटमध्ये आहेत. करोना रक्षक योजना खरेदी करण्यासाठी तुम्ही विमा देणाऱ्या कोणत्याही कंपनीशी संपर्क साधू शकता. यामध्ये जीवन विमा कंपनीचाही समावेश आहे. दोघांमधील सर्वात मोठा फरक म्हणजे करोना कवच योजना ही नुकसानभरपाई-आधारित योजना असल्याने तुम्हाला फक्त रुग्णालयातील बिलाच्या खर्चाचे पैसे परत मिळतात. पण करोना रक्षक योजना निश्चित लाभ योजना असल्याने विमाधारकाला विमा उतरवलेली १०० टक्के रक्कम दिली जाते.

मदत कशी होते
सध्याच्या काळात करोना व्हायरस आरोग्य विमा योजनेचं महत्व वेगळं अधोरेखित करण्याची गरज नाही. अशा योजनांमध्ये रुग्णालयातील खर्च केला जातो ज्यामध्ये रुग्णाचं अलगीकरण, पीपीई किट, निदान आणि आधीपासून असणाऱ्या किंवा नव्याने निर्माण होत असलेल्या व्याधींवरील उपचारांचा समावेश असतो. आपलं वय, शहर, रुग्णालयाचा प्रकार, सध्याचं आणि आधीचं आरोग्य या सर्व गोष्टींचा विचार करुन आपण योग्य विमा रक्कम निवडावी असा सल्ला दिला जातो.

करोना व्हायरस आरोग्य विमा योजनेचा आणखी एक फायदा म्हणजे ही अल्प-मुदत योजना असल्याने तुम्हाला आयुष्यभर याचे हफ्ते भरण्याची गरज नाही. नियमित आरोग्य विमा योजना असणं गरजेचं आहे आणि त्यात कव्हरेज वाढवण्याच्या हेतूने करोना कवच किंवा करोना रक्षक योजना खरेदी केली जाऊ शकते. कोणत्याही करोना व्हायरस आरोग्य विमा योजनेवर दावा असल्यास, विद्यमान आरोग्य विमा योजनेवरील नो-क्लेम बोनसवर त्वरित परिणाम होत नाही.

करोना कवच योजना आणि करोना रक्षक योजना दोन्हीकडे करोनावरील उपचारादरम्यान निर्माण झालेल्या व्याधींनाही कव्हर केलं जातं, मात्र त्यांची मुदत अल्प असते. अल्प-मुदत योजना आणि सध्याची करोनाची स्थिती पाहता जास्त मुदत असलेली आणि मोठी विमा रक्कम असणारी योजना निवडणं जास्त उपयुक्त आहे.

ते पुरेसं आहे का?
करोना व्हायरस आरोग्य विमा योजना खरेदी करण्यासाठी तुम्ही धाव घेण्याआधी तुम्हाला ऑफर करण्यासाठी त्यांच्याकडे काय आहे हे आधी जाणून घ्या. नियमित वैद्यकीय योजनेसाठी हा पर्याय म्हणून पाहिलं जाऊ शकतं का?. दोन्ही करोना व्हायरस आरोग्य विमा योजना तुम्हाला करोनामुळे कराव्या लागलेल्या रुग्णालयाच्या खर्चात मदत करु शकतात. इतर कोणत्या आजारामुळे झालेल्या रुग्णालयाचा खर्च यामध्ये समाविष्ट नाही. यामुळेच या कव्हरेजची व्याप्ती ही कोविडशी संबंधित रुग्णालयाच्या खर्चापुरती मर्यादित ठेवण्यात आली आहे. दोन्ही योजनांमध्ये विम्याची किमान रक्कम ५० हजार असून करोना कवच आणि रक्षक योजनेत जास्तीत जास्त रक्कम ५ लाख आणि अडीच लाख इतकी आहे. जास्तीत जास्त रक्कम प्रतिबंधित असल्याने करोना व्हायरसच्या आरोग्य योजनांना मेडिक्लेमचा पर्याय मानू नका.

तुलना करा आणि तुमच्यासाठी, कुटुंबासाठी सर्वोत्तम आरोग्य विमा योजना घ्या. तसंच, या योजना अल्प-मुदत स्वरुपाच्या आहेत आणि प्रतीक्षा कालावधीसह, साडे तीन महिने, साडे सहा महिने आणि साडे नऊ महिने अशा कालावधीत उपलब्ध आहेत. कुटुंबाच्या आरोग्य वीमा योजनेची काळजी घेण्यासाठी तुम्हाला नियमित वैद्यकीय आरोग्य योजनेची गरज आहे जी तुम्हाला आयुष्यभर संरक्षण देईल.

मेडिक्लेमसाठी पर्याय नाही
रुग्णालयातील खर्चासाठी आपल्या साठवलेल्या पैशांना हात लावावा लागू नये यासाठी आपल्यासाठी आणि कुटुंबासाठी आरोग्य विमा कव्हरेज खरेदी करणं गरजेचं आहे. मेडिक्लेम योजना मुळात व्यापक असून अपघातासोबत कोणत्याही वैद्यकीय कारणामुळे झालेला रुग्णालयाचा खर्च कव्हर होतो. मॅटर्निटी कव्हरेज, ओपीडी तसंच इतर उपचार लक्षात घेता आरोग्य विमा योजनेची व्याप्ती जास्त आहे.

त्यामुळेच करोना व्हायरस आरोग्य विमा योजना ही नियमित आरोग्य विमा योजनेसाठी पर्याय आहे असं समजू नका. करोना कवच योजना आणि करोना रक्षक योजना तुमच्या आरोग्य विमा योजनेतील गरजेसाठी पर्याय नसून विद्यमान आरोग्य विमा कव्हरेजची व्याप्ती वाढवण्यात मदत करतील. जर तुम्ही अद्यापही आरोग्य विमा योजना घेतली नसेल तर सर्व आघाड्यांवर जोखीम पत्करण्यासाठी चांगल्या हेल्थ कव्हर पोर्टफोलिओचं मूल्यांकन करण्याची वेळ आली आहे.

This article was originally posted here