News Flash

विलेपार्ल्यात २४ वर्षीय तरूणीवर सामुहिक बलात्कार

मुंबईतील विलेपार्ले परिसरात एका चोवीस वर्षीय तरूणीवर घरात घुसून सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांतर्फे चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

| March 14, 2013 12:53 pm

मुंबईतील विलेपार्ले परिसरात एका चोवीस वर्षीय तरूणीवर घरात घुसून सामुहिक बलात्काराची घटना गुरुवारी घडली. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.
आरोपींपैकी दोन युवक त्याच परिसरात राहणारे आहेत, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. या प्रकरणातील चारही आरोपींना वांद्रे कोर्टात हजर केलं जाणार आहे.
महिला अत्याचार प्रतिबंधक विधेयकाचा तिढा सुटला असल्याचे मानले जात असून, या विधेयकावर केंद्रीय मंत्रिमंडळ आज (गुरुवार) निर्णय घेतला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईसारख्या शहरात ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2013 12:53 pm

Web Title: %e0%a5%a8%e0%a5%aa year old allegedly gangraped by four persons in vile parle mumbai
Next Stories
1 गॅस सिलिंडर, शिष्यवृत्तीसाठी ‘आधार’ची सक्ती नाही
2 भिंतीचे कान : सेटलमेंट!.
3 बारावी पेपरतपासणीवरील बहिष्कार मागे
Just Now!
X