25 February 2021

News Flash

देशात विक्रमी वीजमागणी

१ लाख ८५ हजार मेगावॉटची नोंद; अर्थचक्र पूर्वपदावर आल्याचे संकेत

१ लाख ८५ हजार मेगावॉटची नोंद; अर्थचक्र पूर्वपदावर आल्याचे संकेत

मुंबई : देशात बुधवारी विक्रमी १ लाख ८५ हजार ८२२ मेगावॉटची वीजमागणी नोंदविण्यात आली. करोना टाळेबंदीनंतर हळूहळू जनजीवन आणि अर्थचक्र पूर्वपदावर येत असल्याचा हा संके त मानला जातो.

करोनामुळे मार्च २०२० च्या अखेरीस देशभरात टाळेबंदी लागू झाली. जनजीवन-उद्योग-व्यवसाय ठप्प झाले. जूनपासून हळूहळू निर्बंध शिथिलीकरण सुरू झाले. त्याचे काही परिणाम दिवाळीच्या आसपास दिसले आणि ‘जीएसटी’ने एक लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. वीजमागणी हाही अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा निकष मानला जातो.

देशात बुधवारी विक्रमी १ लाख ८५ हजार ८२२ मेगावॉट इतकी वीजमागणी नोंदवली गेली. के ंद्रीय ऊर्जा सचिव संजीव सहाय यांनी तसे ट्वीट करून जाहीर के ले. याआधी ३० डिसेंबरला १ लाख ८२ हजार मेगावॉट वीजमागणी नोंदवली गेली होती.

राज्यात २१ हजार ९२३ मेगावॉट

महाराष्ट्रात बुधवारी तब्बल २१ हजार ९२३ मेगावॉट इतकी वीजमागणी नोंदवली गेली. महानिर्मितीच्या प्रकल्पांमधून ६३२५ मेगावॉट तर के ंद्रीय वीजप्रकल्पांमधून ५७५९ मेगावॉट वीज मिळाली. याबरोबरच साखर कारखान्यांच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पांमधून १२२७ मेगावॉट वीज मिळाली. बाकीची वीज विविध कं पन्यांशी के लेल्या वीजखरेदी करारानुसार घेण्यात आली. मुंबईतही वीजमागणी २३५० मेगावॉटपर्यंत पोहोचली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2021 2:03 am

Web Title: 1 lakh 85 thousand 822 mw of electricity demand recorded in the country zws 70
Next Stories
1 ‘तांडव’च्या दिग्दर्शकाला अटकेपासून तूर्त दिलासा
2 खासगी बँकांना मर्यादित शासकीय व्यवहारांना परवानगी
3 Coronavirus : मुंबईत उपचाराधीन रुग्णांत घट
Just Now!
X