News Flash

अल्पसंख्याकांच्या विकासाकरिता १०० कोटीसाठी हमी

राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी शासनकटीबद्ध असून मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला केंद्राकडून देण्यात येणाऱ्या १०० कोटी रुपये निधीसाठी राज्य शासन हमी द्यायला तयार आहे, अशी

| January 18, 2015 03:32 am

राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी शासनकटीबद्ध असून मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला केंद्राकडून देण्यात येणाऱ्या १०० कोटी रुपये निधीसाठी राज्य शासन हमी द्यायला तयार आहे, अशी ग्वाही राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.
केंद्रीय अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी शनिवारी मुंबईत होते. त्यावेळी त्यांनी राज्याच्या अल्पसंख्याक विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. अल्पसंख्याक समाजाच्या सर्वागिण विकासासाठी केंद्र सरकार निधी कमी पडू देणार नाही, असे त्यांनीही आश्वासन दिले.
या वेळी राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री खडसे यांनी राज्यात अल्पसंख्याकांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रगतीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची केंद्रीय मंत्र्यांना माहिती दिली. केंद्राकडून मौलाना आझाद महामंडळाला १०० कोटींचा निधी मिळणे अपेक्षित आहे. त्यासाठी राज्य शासन हमी द्यायला तयार आहे व लकरच तसा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर केला जाईल, अशी माहिती खडसे यांनी
दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2015 3:32 am

Web Title: 100 cr to maha minorities welfare body
टॅग : Minorities
Next Stories
1 ‘एसटी’ला ९८८ कोटींचा टोलफटका
2 मेट्रो विधानभवन स्थानकासाठी पक्ष कार्यालयांचे स्थलांतर
3 पनवेल तालुक्यातील वाहनांच्या टोलमुक्तीसाठी समिती
Just Now!
X