News Flash

१०० वर्षांचे आजोबा करोनामुक्त

नारिंग्रे आदी गावांतील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक म्हणून काम केले आहे.

१०० वर्षांचे आजोबा करोनामुक्त

मुंबई : करोनाची बाधा झाल्यामुळे जोगेश्वरी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयामध्ये दाखल झालेले ज्येष्ठ नागरिक अर्जुन गोविंद नरिंग्रेकर यांनी मंगळवारी करोनावर मात केली. करोनाची बाधा झाल्यामुळे त्यांना १ जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विशेष म्हणजे बुधवार, १५ जुलै रोजी नरिंग्रेकर यांनी वयाची १०० वर्षे पूर्ण केली आहेत. रुग्णालयातून त्यांना मंगळवारी घरी पाठविण्यात आले. डॉक्टर, परिचारिका आणि अन्य कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात त्यांचा १०१वा वाढदिवस साजरा केला आणि त्यांना घरी पाठविण्यात आले. अर्जुन नारिंग्रेकर मूळचे देवगड तालुक्यातील नारिंग्रे गावचे रहिवासी असून मिठबाव, दहिबाव, विजयदुर्ग, कोळोशी, नारिंग्रे आदी गावांतील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक म्हणून काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 3:08 am

Web Title: 100 year old man recovers from coronavirus in mumbai zws 70
Next Stories
1 टाळेबंदीआधी कामावर असलेल्यांनाच पूर्ण वेतनाचा लाभ
2 प्रथम आणि द्वितीय वर्षांचे निकालही रखडलेलेच
3 करोनामुक्त झाल्यावरही पुन्हा लक्षणे
Just Now!
X